एका रात्रीत कंगाल झालेल्या क्रिप्टो एक्सचेंज (Crypto Currency) कंपनीमधून ग्राहकांचे तब्बल एक अब्ज म्हणजेच जवळपास ८०५४ करोड रुपये गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एक्सचेंजचचा संस्थापक बँक्समन फ्रॉईड यांनी खातेधारकांचे तब्बल १० अब्ज डॉलर ट्रेडींग कंपनी अलामेडा रिसर्जकेडे हस्तांतरित केल्याचे उघडकीस आलं आहे. शिवाय या व्यवहारानंतर ट्रान्सफर करण्यात आलेल्या रकमेबाबत कोणाला माहिती नसल्याची माहीती एका वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा- एक लाख २८ हजार कोटी संपत्तीहून थेट शून्यावर… ३० वर्षांचा अब्जाधीश एका दिवसात झाला कंगाल

मिळालेल्या माहितीनुसार, संस्थापकाने केलेल्या या व्यवहारामधील मोठ्या रकमेबाबत अद्यापही कोणालाच काही माहिती नाहीये. शिवाय या प्रकरणाशी संबधित लोकांच्या म्हणण्यानुसार, अफरातफर झालेली रक्कम १ ते २ अब्ज डॉलरच्या आसपास असल्यानी शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकन कंपनी एफटीएक्स कंपनी मोठ्या अडचणीत सापडली आहे.

दरम्यान, एक्सचेंजचे संस्थापक बँक्समन फ्रॉईड याने मागील रविवारी कंपनीची आर्थिक आकडेवारी इतर अधिकाऱ्यांना सांगितली. त्यावेळी कंपनीमधील पैशांबाबत गोंधळ उघडकीस आला असल्याची माहिती एफटीएक्समध्ये उच्च पदावर कार्यरत असलेल्या दोन व्यक्तींनी दिली.

कंपनी दिवाळखोरीत

या आठवड्यात लोकांनीएफटीएक्समधून मोठ्या प्रमाणात पैसे काढले, त्यानंतर कंपनीने शुक्रवारी दिवाळखोरीसाठीची कागदपत्रे देखील सादर केली आहेत. तर दुसरीकडे कंपनीच्या जो क्रिप्टो एक्सचेंज बीनांससोबत बचाव करार झाला तो देखील अद्याप प्रत्यक्षात आलेला नाहीये.

दरम्यान, वृत्तसंस्थांकडून १० अब्ज डॉलर हस्तांतरित झाल्याच्या मुद्यावर प्रश्न उपस्तित केला असता फ्राइड म्हणाले की, “हा व्यवहार गपचुप केलेला नाहीये. याबाबत चुकीची माहिती प्रसारीत झाल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे. ” शिवाय एका ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, या आठवड्यात घडलेल्या घडामोडी पोहून मी गोंधळलो असून प्रकरणाचा सर्व खुलासा करणार असल्याचं बँक्समनने सांगितलं.

आणखी पाहा- Twitter Blue Tick: ट्विटरकडून देवालाही ‘ब्लू टीक’; येशू खिस्त्रांच्या व्हेरिफाईड अकाऊंटची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

एका दिवसात झाला कंगाल –

जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म बिनांस याने FTX च्या खरेदीची घोषणा केल्यानंतर क्रिप्टो एक्सचेंजची संपत्ती झपाट्याने घसरल्यामुळे बँक्समनच्या संपत्तीमध्यये एका दिवसात सुमारे ९४ टक्क्यांनी घसरण झाली असून, ही कोणत्याही अब्जाधीशांच्या संपत्तीत एकाच दिवसात झालेली ही सर्वात मोठी घसरण असल्याचे सांगितलं जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: American company 8000 crores missing from account of bankrupt crypto exchange ftx jap93
First published on: 12-11-2022 at 14:05 IST