पुरुष जेव्हा दाढी करण्यासाठी सलूनमध्ये जातात, तेव्हा हमखास तिथल्या दाढी करून देणाऱ्या माणसाला ‘चंपी’ करण्यासाठी सांगतात. या ‘चंपी’ने म्हणजेच डोक्यावर तेल घालून चांगला १५-२० मिनिटे मसाज करून, डोक्यावरचा संपूर्ण ताण घालविता येतो, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. भारतातील प्रत्येक गल्ली-बोळात असणाऱ्या लहानातल्या लहान सलूनमध्ये आपल्याला असे भन्नाट चंपीवाले सापडतील.

आपल्या भारतात करून घेतलेले तेल-मालिश एका परदेशस्थ तरुणाला इतके आवडले की, त्याने चक्क इलॉन मस्ककडे “या माणसाला कामावर ठेवा”, अशी मागणी केली आहे. या अमेरिकन यूट्युबरच्या चॅनेलचे नाव dailymax24 असे आहे. त्याने याआधीदेखील असे मसाज करून घेतानाचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये नेमके काय दाखवले आहे ते पाहू.

हेही वाचा : मालक अन् कावळ्यात रंगला फुल्ली-गोळ्याचा खेळ! पाहा कोण जिंकलं…. Video होतोय व्हायरल

रस्त्याच्या कडेला उघड्यावर केवळ एक खुर्ची टाकून मोहम्मद नावाच्या माणसाने त्याचे छानसे हवेशीर सलून तयार केले होते. त्या खुर्चीत बसून, मॅक्सने त्याला ‘हेड मसाज’, असे सांगितले. मॅक्ससाठी वृद्ध मोहम्मदने खास त्याच्या सामानामधून शोधून, एक तेलाची पॅकबंद बाटली काढली. त्यातील थोडेसे तेल हातावर घेऊन, मॅक्सच्या डोक्याला त्याने मस्त चंपी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला छान तेल लावून, बराच वेळ विविध पद्धतींनी मॅक्सच्या डोक्याला मालिश केल्यानंतर, त्या वृद्ध गृहस्थाने मॅक्सच्या मानेला आणि चेहऱ्याला मसाज करण्यास सुरुवात केली.

इतकेच नाही, तर त्याची अवघडलेली मान आणि हात मोकळे करण्यासाठी, त्या अमेरिकन यूट्युबरची मान आणि हाताची बोटेसुद्धा त्याने न सांगता मोडून दिली. खरे तर मॅक्ससाठी हे सर्व अनपेक्षित होते. मात्र, त्या यूट्युबरला या संपूर्ण ‘चंपी’मधून प्रचंड आराम मिळत असल्याचे तो सात्याने सांगत होता. तसेच ते त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांवरूनदेखील आपण पाहू शकतो.

संपूर्ण मसाज संपल्यानंतर मॅक्सने “किती रुपये झाले,” असा प्रश्न विचारल्यावर त्या वृद्ध व्यक्तीने, “तुमच्या मर्जीनुसार द्या,” असे उत्तर दिले. तेव्हा आजूबाजूला बसलेल्यांना “यांना २०० रुपये देऊ? तेवढे ठीक आहेत ना?” असे विचारले. मात्र, व्हिडीओच्या शेवटी मॅक्सने त्या मसाज करणाऱ्या व्यक्तीला ५०० च्या बऱ्याच नोटा दिल्याचे आपण पाहू शकतो. तसेच शेवटी त्या जागेचा पत्तादेखील त्याने सांगितला आहे.

हेही वाचा : Viral : तरुणीला झाला ‘प्रेमाचा’ आजार! प्रियकराला करायची १०० मेसेज! डॉक्टर म्हणाले, “हिला…”

या व्हिडीओवर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या पाहू.

“त्या नोटा पाहून मला वाटतं की, मॅक्सनं सहज त्या मसाजवाल्या काकांना तीन-चार हजार रुपये तरी दिले असतील. ता काकांना हे कायम आठवणीत राहणार आहे,” असे एकाने लिहिले आहे.
“खरंच हा प्रचंड सुंदर मसाज होता.. एकदम भारी”, असे दुसऱ्याने लिहिले.
“मॅक्स, तू खरंच खूप भारी माणूस आहेस,” असे तिसऱ्याने लिहिले.
“संपूर्ण व्हिडीओमध्ये त्या मसाजवाल्या काकांच्या चेहऱ्यावरचं हसू कायम होतं,” असे चौथ्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मॅक्सने त्याच्या @dailymax24 या चॅनेलवरून शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.