क्रिकेट खेळात आवडत्या टीमची गोलंदाजी सुरू असताना जेव्हा विरुद्व टीमची विकेट पडते तेव्हा आपला आनंद गगनात मावेनासा होता. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इथे एका १८ वर्षांच्या तरुणाने सर्वांत उंच बॉल झेलून विश्वविक्रम केला आहे. त्याने टेनिस बॉलचा सर्वांत उंच झेल घेऊन दाखवला आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यासंबंधीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

कॅमरॉन असे या तरुणाचे नाव आहे. तसेच तो १८ वर्षांचा आहे. हा १८ वर्षांचा तरुण टेनिस बॉलचा सगळ्यात उंच झेल घेण्यात यशस्वी झाला आहे.गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने यांच्या अधिकृत अकाउंटवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यात तुम्ही पाहू शकता की, ड्रोनच्या साह्याने अगदीच उंचावरून टेनिस बॉल फेकण्यात येतो. तसेच १८ वर्षांचा हा तरुण उंचावरून आलेला हा बॉल अगदी सहज झेलतो. कशा प्रकारे या तरुणाने उंचावरून फेकलेला हा टेनिस बॉल त्याच्या हातात झेलला एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…

हेही वाचा…“जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं देवा तुझ्या नावाचं…” ओढण्यांच्या दुकानात विठ्ठल दिसतोय का ? एकदा नीट पाहा…

व्हिडीओ नक्की बघा :

टेनिस बॉलचा घेतला सर्वांत उंच झेल :

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स यांनी दिलेल्या कॅप्शननुसार हा टेनिस बॉलचा झेल १४३.११ मीटर म्हणजेच ४६९ फूट तर ६.२ इंच इतक्या उंचावरून फेकण्यात आला होता; जो १८ वर्षांच्या तरुणाने अगदी सहज झेलला. कॅमेरॉन हेनिगने ४६९.५ फूट उंचावरून आलेला हा चेंडू पकडला. हा अनोखा विश्वविक्रम करताना कॅमेरॉनचा मित्र ज्युलियनने त्याची मदत केली. ज्युलियनने एवढ्या उंचीवरून टेनिस बॉल सोडण्यासाठी ड्रोनचा उपयोग केला, असे सांगण्यात येत आहे. विश्वविक्रम करणारा १८ वर्षांचा मुलगा आणि त्याचा मित्र हे अमेरिकेचे रहिवासी आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स यांच्या अधिकृत @GWR या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. तसेच कॅप्शनमध्ये १८ वर्षांच्या तरुणाच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले आहे. हा विश्वविक्रम करण्यासाठी दोन्ही तरुणांनी खूप सराव केला. तसेच टेनिस बॉलचा झेल घेताना या तरुणाने कोणत्याही प्रकारचे हातमोजे घातले नव्हते. टेनिस बॉलचा इतक्या उंचावरून आलेला झेल घेतल्यानंतर, “हे खरोखर खूप कठीण होते; पण मला वाटले होते तितकी दुखापत झाली नाही,” असे कॅमरॉन म्हणाला.