माणसाने माणसाशी माणसासम वागणे! ही प्रार्थना तुम्ही अनेकदा ऐकली असेल पण या ओळीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? माणुसकीचा खरा अर्थ सांगणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर रोज कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात पण काही मोजकेच व्हिडिओ असे असतात जे मनाला किंवा हृदयाला भिडतात. अशाच एका व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला पोलिस कर्मचारी एका रुग्णवाहिकेला वाट करून देण्यासाठी मदत करताना दिसत आहे. हा व्हिडिओ महिला पोलिस कर्मचारीचा कर्तव्यदक्षापणा दाखवून देतो पण तिच्यामध्ये असलेली माणुसकी देखील दर्शवतो आहे.

रुग्णवाहिका ही प्रत्येक रुग्णांचा प्राण वाचवण्यासाठी रस्त्यावरून धावत असते. पण अनेकदा रुग्णवाहिकेला वाहतूक कोंडीतून वाट काढत रुग्णाला वेळेत रुग्णालयात दाखल करावे लागते. अनेकदा वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला वाट करून देण्यासाठी काही लोक स्वत:हून पुढे येतात. या कृतीतून त्यांची माणूसकी दिसून येते. अशा एका कर्तव्यदक्ष महिला कर्मचाऱ्याचा रुग्णवाहिकेला वाट करून देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक रुग्णवाहिका वाहतूक कोंडीमध्ये अडकली आहे. वाहनांची मोठी रांग लागलेली आहे. तेवढ्यात एक महिला कर्मचारी रुग्णवाहिकेला वाट करून देण्यासाठी वाहनांच्या मधून धावताना दिसते. काही वाहनांना ती बाजूला होण्याचा इशारा करत ती पुढे धावत राहते.

व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. इंस्टाग्रामवर lay_bhari_official नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”समाजाला अशाच कर्तव्यदक्ष पोलि‍सांची गरज आहे.”

व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी महिला पोलि‍सांचे कौतुक केले आहे. एकाने कमेंट करत लिहिले की,”सलाम अशा इमानदार पोलि‍सांना”

दुसर्‍याने लिहिले की, “एक नंबर ताई तुमच्या कामाला आमचा सलाम.”

तिसर्‍याने कमेंट केली की, सेवेपलीकडील कर्तव्य.”