जगात प्रत्येक व्यक्ती खास असते. मग भलेही त्याला कोणता आजार असो किंवा आणखीन कोणते वेगळे कारण असो. या आजारांचा कधी कधी लहान मुलांनाही सामना करावा लागतो.पण, अशा व्यक्तींना कमी दर्जाचे समजू नये. एका अमेरिकन महिलेने ही गोष्ट करून दाखवली आहे. तिने भारतातील एका मुलीला दत्तक घेतले.पण, या महिलेचे कौतुक यासाठी होत आहे, कारण ही दत्तक घेतलेली मुलगी डाऊन सिंड्रोम या आजाराने ग्रस्त होती. तर सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होत आहे.
चिमुकलीला दत्तक घेणाऱ्या महिलेचं नाव मेगन असे आहे. महिलेचे इन्स्टाग्राम अकाउंट बघता ती दोन मुलांची आई आहे. गेल्या वर्षी दिवाळीदरम्यान महिला भारतात जाते. तसेच तिने डाऊन सिंड्रोम या आजाराने ग्रस्त असलेल्या एका लहान मुलीला तिथे दत्तक घेते आणि तिचे नाव एमी असे ठेवते. डाऊन सिंड्रोम ही अनुवांशिक स्थिती आहे, ज्यामुळे मुलाला मानसिक आणि शारीरिक विकार होतात. तर या मुलीला दत्तक घेऊन एक वर्ष पूर्ण झाले या आनंदात महिलेने एक भावुक पोस्ट शेअर करून ही बातमी सर्वांपर्यंत पोहचवली. आईने आपल्या लेकीसाठी लिहिलेली भावुक पोस्ट एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा.
हेही वाचा…“संस्कृती जपणारी शिवकन्या…” साडी नेसून बस चालवणाऱ्या महिलेचा व्हिडीओ होतोय व्हायरल
पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा :
https://www.instagram.com/p/Cyv7913r8fl/?igshid=MzRlODBiNWFlZA%3D%3D&img_index=1
खास क्षणाला एक वर्ष होताचं आईने लिहिली भावुक पोस्ट :
महिला आणि तिचे कुटुंब दिल्लीत ताज हॉटेलमध्ये थांबले होते. तिथून चार किलोमीटर दूर अंतरावर ही मुलगी एका गावात राहत होती. तिथे जाऊन त्यांनी या मुलीला दत्तक घेतले आणि आपल्याबरोबर अमेरिकेला घेऊन आले. तर या दिवसाला एक वर्ष पूर्ण झालं. तर महिलेनं या दिवसाला खास करायचे ठरवले आणि सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यात महिलेने असे लिहिले की, आजच्या दिवशी एक वर्षांपूर्वी दिवाळीचा सण सुरू होता. आम्ही पॅकअप केले आणि दिल्लीतून अमेरिकेला घरी जाण्यासाठी निघालो. ही आयुष्यातील एक खास सहल होती; ज्याची मी दररोज आठवण काढते. तसेच महिला ताज हॉटेलचेसुद्धा आभार मानते आणि तिच्या सर्व मुलांसोबत परत जाण्याची इच्छा आहे असे ती कॅप्शनमध्ये मांडताना दिसते आहे.
महिलेच्या @realistcplantbasedmama या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट शेअर करण्यात आली आहे. तसेच या खास क्षणाचे पाच फोटो शेअर केले आहेत. यात सुरुवातीला महिलेने दत्तक घेतलेल्या मुलीसोबत आणि नवऱ्यासोबत फोटो शेअर केला आहे. तसेच दिल्लीच्या विमानतळावरील दिवाळी निमित्तचे पोस्टर आणि दत्तक घेतलेल्या मुलीसोबत प्रवास करतानाचे काही क्षण पोस्ट करण्यात आले आहेत. ही पोस्ट पाहून तुम्ही काही क्षणासाठी नक्कीच भावुक व्हाल…