Viral Video: शालेय जीवनातील आठवणींच्या पेटीमध्ये मस्ती, शिक्षा, आवडते शिक्षक, खेळ, अभ्यास आदी गोष्टींचा समावेश आहे. पण, या सगळ्यात विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा काळ हा टेन्शनचा असायचा. बाकीच्या विषयांचे पेपर पाठांतर किंवा उत्तरे लक्षात ठेवून अगदी सहज सोडविले जायचे. पण, गणित विषयात मात्र सरावाशिवाय कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे गणिते सोडविण्याच्या पायऱ्या नीट लक्षात ठेवण्याचे दडपण, एखादं गणित सोडविता न आल्याची निराशा, नापास होण्याची भीती व तणाव मनात नेहमीच असायचा. आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये गणिताचा पेपर अवघड गेला म्हणून की काय त्याने शिक्षकासाठी एक खास संदेश पेपरमागे लिहून ठेवला आहे.

आताच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान व अभ्यासासाठी विविध स्रोत उपलब्ध असताना देखील परीक्षा व गणिताच्या पेपरची भीती कित्येक विद्यार्थ्यांच्या मनात कायम आहे. अलीकडेच हर्ष बेनिवाल नावाच्या विद्यार्थ्याने अशीच भीती त्यांच्या गणिताच्या पेपरदरम्यान दाखवली. तसेच त्याच्या या भीतीने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

शिक्षक व इन्स्टाग्राम युजर राकेश शर्मा यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे; ज्यामध्ये विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेच्या शेवटी एक छोटी कविता लिहिली आहे. शिक्षक विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका तपासत असतात. विद्यार्थ्याला गणित विषयात त्याच्या प्रत्येक प्रश्नावर त्याने किती गुण मिळवले हेसुद्धा सांगतात. पण, विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेच्या शेवटी लिहिलेलं पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल अन् हसू येईल. नक्की काय लिहिलं आहे विद्यार्थ्याने व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…पालक, प्रकल्प अन् विद्यार्थी! आईने VIDEO शेअर करत सांगितली ‘ती’ गोष्ट; शिक्षकांकडे केली अनोखी मागणी

व्हिडीओ नक्की बघा…

View this post on Instagram

A post shared by Rakesh_Sharma0989 (@rakesh.sharma.sir)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, विद्यार्थ्याने गणित सोडवलेली असतात. काही गणिते त्याने अचूक; तर काही ठिकाणी बऱ्याच चुका असतात. या सर्व गोष्टी व्हिडीओद्वारे दाखवीत शिक्षक उत्तरपत्रिकेचे सगळ्यात शेवटचे पान दाखवतो. शेवटच्या पानावर विद्यार्थ्याने हिंदीत, “पढ़ पढ के क्या करना है, एक दिन तो मरना है, फिर भी पास होने की इच्छा हैl“ (अभ्यास करून काय करणार? शेवटी मरावेच लागते. तरीही माझ्या मनात पास होण्याची इच्छा आहे), असे लिहिलेले असते. हे पाहून शिक्षकही चकित होतात आणि त्याला जेवढी गणिते बरोबर आली आहेत, त्याचे गुण देताना दिसतात आणि इकडेच व्हिडीओचा शेवट होतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @rakesh.sharma.sir या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून एक युजर म्हणतोय, “आयुष्यात फक्त एवढा आत्मविश्वास“ आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.