बेकी बेकमन या महिलेने १० वर्षांपूर्वी आपला अ‍ॅपल आयफोन हरवला होता. तिने सर्व ठिकाणी आपला फोन शोधला पण तिला तो सापडला नाही. अखेर तिने एक नवा फोन विकत घेतला. परंतु मेरीलँड येथे राहणारी ही महिला आपला फोन नक्की कुठे गेला या विचाराने गोंधळून गेली होती कारण तिने घरही सोडले नव्हते आणि ती मद्यपान देखील करत नसे. आयफोन हरवणे हे एक रहस्य बनले होते.

द न्यूयॉर्क पोस्टनुसार, २०१२ मध्ये हॅलोवीनच्या रात्री बेकमनचा फोन हरवला होता. गूढ उकलल्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, “मी नवीन आयफोन घेतला आहे. काहीही असो. तो रहस्यमय होता पण तो हरवला होता.” बेकमन आणि तिच्या पतीला त्यांच्या टॉयलेटमधून विचित्र आवाज ऐकू आला तेव्हा हरवलेल्या आयफोनच्या प्रकरणाचे गूढ उलगडले. टॉयलेटमध्ये फ्लश केल्यानंतर हा आवाज ऐकू येत होता.

फक्त सहा तास झोपून ‘हा’ व्यक्ती कमावतो लाखो रुपये; Sleep Stream ठरतंय लोकप्रिय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

news.com.au नुसार, बेकमन हिने सांगितले, ‘सुरुवातीला आम्ही या आवाजाला शौचालय जुने असणे किंवा घराचे बांधकाम भयानक असल्याचा दोष दिला.’ तथापि, जेव्हा तिच्या पतीने त्या शौचालयामध्ये शोधकाम करण्याचे ठरवले तेव्हा त्यांना १० वर्षांपूर्वी हरवलेला फोन सापडला. त्या दोघांचा या गोष्टीवर विश्वासच बसला नाही. डिव्हाइसचा मागील भाग उघडला होता, त्यामुळे त्याचा आतील भाग दिसत होता, परंतु टॉयलेट पाईपमध्ये दहा वर्ष पडलेला असूनही हा आयफोन खूपच चांगल्या स्थितीत होता.