प्रसिद्ध उद्योगपती तसंच महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा त्यांच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी शेअर केलेले अनेक व्हिडीओ लोकांना हसवतात तर काही व्हिडिओ भावूक करतात. मात्र यावेळी त्यांनी आपल्या ओळखीच्या लोकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आनंद महिंद्रा यांनी नुकतीच लाँच झालेली महिंद्रा कंपनीची नवीन कार स्कॉर्पिओ एन कार खरेदी केली आहे आणि त्यासोबत त्यांनी नवीन कारचा फोटो देखील शेअर केला आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे आनंद महिंद्रा यांनी ही आनंदाची बातमी देताना त्यांच्या चाहत्यांना या कारला नवीन नाव सुचवा अस सांगितलंय. लोकांनी देखील यावर मजेशीर नावं सुचवली आहेत.

आनंद महिंद्रा यांनी खरेदी केली स्कॉर्पिओ एन

महिंद्रा कंपनीच्या नवीन कार स्कॉर्पिओ एनची चर्चा खूप दिवसांपासून होत आहे. हे मॉडेल जुन्या स्कॉर्पिओपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. लोकांनी त्याची बुकिंगही सुरू केली आहे. त्याचवेळी हे नवीन मॉडेल महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांच्या घरीही पोहोचले आहे. ही आनंदाची बातमी देताना आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, “आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा आहे. मला माझी स्कॉर्पिओ एन मिळाली, त्यासाठी चांगले नाव सुचवा..तुमच्या सूचनांचे स्वागत आहे.” आनंद महिंद्रा यांनी नाव सुचवायला सांगताच अनेकांनी यावर कंमेंट करायला सुरुवात केली आहे.

Nagpurs young people feed Nagpuri kharra to the foreigner
Video : “यालाच अतिथी देवो भव: म्हणायचं का?” नागपूरच्या तरुणांनी फॉरेनरला खाऊ घातला खर्रा; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
Shocking video of using toilet water for making food in medical college madhya pradesh viral video on social media
“लोकांचा जीव घेणार का आता?” मेडिकल कॉलेजमध्ये जेवण…
Viral Video
Video : जगातील सर्वात सुंदर नंबर प्लेट पाहिली का? फक्त शिवप्रेमीच याची किंमत समजू शकतो, व्हिडीओ होतोय व्हायरल
Puneri pati funny advertise xerox shop owner advertise for xeox copy in puneri way puneri poster
PHOTO: झेरॉक्सच्या दुकानाबाहेर पुणेकरानं लावली अशी पाटी की होऊ लागली गर्दी; मार्केटींगची हटके आयडिया पाहून पोट धरुन हसाल
the biker hit the bicycle
सांगा, चूक कोणाची? बेशिस्त दुचाकीस्वाराने आधी धडक दिली, मग सायकल फरफटत नेली; सायकलस्वाराने ‘अशी’ घडवली अद्दल! Video Viral
Viral video See what the young boy did when he saw a woman standing with a baby in the local crowd
VIDEO: “फक्त शिक्षण नाही तर संस्कारही महत्त्वाचे” लोकलच्या भर गर्दीत बाळाला घेऊन उभ्या असलेल्या महिलेला पाहून तरुणानं काय केलं पाहा
Another Google Maps Error Leads Delhi Driver Into Buxar Pond Watch Viral Video
बक्सरवरून दिल्लीला निघाले पण पोहचले तलावात, गुगल मॅपने केला घात! Viral Video बघाच
Shocking video of Terrible accident of woman fall from stage viral video on social media dvr 99
एक पाऊल मृत्यूच्या दारात! स्टेजवरून पाय घसरला अन् खालीच कोसळली, महिलेबरोबर जे घडलं ते पाहून उडेल थरकाप, पाहा VIDEO
We need such a shortcut at every important intersection in Pune
“पुण्यात प्रत्येक महत्त्वाच्या चौकात असा शॉर्टकट पाहिजे!”, काय म्हणता पुणेकर, Viral Videoवर कमेंटचा पाऊस

( हे ही वाचा: प्रेम कधीच म्हातारे होत नाही! थरथरत्या हातांनी पतीचा हात धरत तिने गायले गाणे….रुग्णालयातील हृदयस्पर्शी व्हिडिओ एकदा पाहाच)

( हे ही वाचा: Baba Vanga: नवीन युगातील बाबा वेंगा बनली ‘ही’ १९ वर्षीय युवती; २०२२ मध्ये तिने केलेल्या ‘या’ भविष्यवाण्या ठरल्यात खऱ्या)

लोकांनी सुचवली वेगवेगळी नावे

आनंद महिंद्रा यांच्या स्कॉर्पिओ एन या नवीन कारसाठी लोकांनी वेगवेगळी नावे सुचवली आहेत. एसके अहिरवार यांनी या गाडीचे नाव निष्क असे सुचवले आहे. प्राचीन काळी वापरल्या जाणाऱ्या निष्क या सोन्याच्या नाण्यावरून त्याचे नाव असावे असे त्याने लिहिले आहे. रुद्र नावाच्या युजरने लिहिले की, त्याचे नाव योगेंद्र असावे. हे नाव परमवीर चक्र विजेत्याचा खरा सन्मान असेल. महिंद्रा स्कॉर्पिओ भारतीय लष्कराच्या सेवेत दाखल केली जाईल, म्हणून ते योग्य नाव असेल. एका युजरने त्याला हेड्स असे नाव सुचवले आहे. हेड्स स्कॉर्पिओ अधोलोक ग्रीक देव आहे. तर एकाने याला धन्नो नाव ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

Story img Loader