आनंद महिंद्रा जितके चांगले बिझनेसमन आहेत तितकेच चांगले व्यक्तीही आहे. ते सोशल मीडियावर नेहमी काही ना काही पोस्ट करत असतात. आपल्या चाहत्यांसह मजेशीर व्हिडीओ शेअर करतात आणि किस्से सांगतात. ट्रेंडिंग व्हिडीओच्या माध्यमातून ते स्वत:ला लोकांसह जोडतात. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि घडमोडी शेअर करतात ज्यामुळे लोकांना नेहमी प्रेरणा मिळते. आणि लोक त्याचा आंनदही घेतात. महिंद्रा हे जुगाडू आणि माहितीपूर्ण ट्विटसमुळे नेहमी चर्चेत असतात पण यावेळी त्यांनी एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

सध्या थंडीचा ऋतू आहे, त्यामुळे बहुतेक लोक आंघोळ करणे टाळतात. पण, असे अनेक लोक आहेत ज्यांना कितीही थंडी असली तरी काहीही फरक पडत नाही आणि पाणी कितीही थंड असले तरी ते दररोज अंघोळ करतात. अशा परिस्थितीत आनंद महिंद्रा यांनी एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती तलावाच्या मध्यभागी बसून मोठ्याने म्हणत आहे, “बंधू-भगिनींनो, या, आम्ही तुमच्या नावाने स्नान करू. जर तुम्हाला थंडीच्या ऋतूमध्ये स्नान करायचे नसेल, आंघोळ करायची नसेल तर तुमचे नाव सांगा आणि १० रुपयांची पावती घ्या… आम्ही या ऋतूत तुमच्या नावाने स्नान करू. तुमच्या नावाचे पुण्य तुम्हाला मिळेल पण तुम्ही दिलेले १० रुपये आम्हाला मिळतील. चला १० रुपयात डुबकी मारायची आहे का?”

हेही वाचा – आजींचा स्वॅग! एफसी रोडवर ‘थार’च्या बोनेटवर बसून फिरताना दिसल्या आजीबाई! Viral Video पाहून संतापले नेटकरी

हेही वाचा – Video : चिमुकल्याचे लावणी नृत्य पाहून नेटकरी झाले फिदा; म्हणाले, “चंद्राला पण, लाजवले पोराने!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पैसे कमावण्यासाठी लोक एकापेक्षा एक युक्ती शोधून काढतात. तरुणाची ही भन्नाट युक्ती लोकांना आवडली आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ९ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना त्यांचे हसू आवरणे कठीण झाले आहे. व्हिडिओवर लोकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “भारत जगातील डेस्टिनेशनचे आउटसोर्सिंग करत आहे यात काही आश्चर्य नाही.” कमेंट करताना एकाने लिहिले, “अशा आश्चर्यकारक लोकांना पाहून मला काळजी वाटते.” दुसर्‍याने लिहिले, “ही एक अतिशय चांगली व्यवसाय कल्पना आहे. “