प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा सोशल मीडियावर बरेच सक्रीय असतात. विविध विषयांवरील त्यांच्या पोस्ट बऱ्याच व्हायरल होत असतात. आनंद महिंद्रा यांनी नुकताच त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काही व्यक्ती झाड तोडताना दिसत आहेत. पर्यावरणाला हानी पोहचवणाऱ्या या व्यक्तींचा निसर्गाकडूनच कशाप्रकारे सूड घेतला गेला हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. आनंद महिंद्रा यांनी या व्हिडीओला लक्ष वेधणारे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ सध्या बराच व्हायरल होत आहे.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सहा लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे. या व्हिडीओमध्ये काही व्यक्ती जंगलातील एक झाड कापताना दिसत आहेत. हे भव्य झाड जेव्हा पूर्णपणे कापले जाते, तेव्हा ते खाली पडत असताना त्यांच्यातील एक व्यक्ती झाडासह वर जात नंतर खाली कोसळतो. यामुळे त्या व्यक्तीला इजा झाल्याची शक्यता आहे. ‘जर तुम्ही झाडं कापली तर तुम्हाला निसर्ग सहजरित्या माफ करणार नाही’ असे कॅप्शन आनंद महिंद्रा यांनी या व्हिडीओला दिले आहे.

VIRAL VIDEO : स्वत:च्या शिक्षणासाठी ही मुलगी विकतेय पाणीपुरी; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत आनंद महिंद्रा यांच्या कॅप्शनशी सहमत असल्याचे सांगितले आहे. ‘जर आपण अशाप्रकारे निसर्गाला त्रास देत राहिलो, पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास कारणीभूत ठरलो तर आपल्याला याचे परिणाम नक्की भोगावे लागणार’, ‘जर आपण निसर्गाचे संवर्धन केले तर आपले जीवन सुखकर होईल’ अशा कमेंट या व्हिडीओवर करण्यात आल्या आहेत.