आज आपल्या दैनंदिन जीवनात मोबाईल महत्वाचा घटक बनला आहे. मोबाईल हातात घेऊन दिवसाची सुरुवात तर मोबाईलवरच रिल्स स्क्रोल करतच दिवसाचा शेवट होतो. तसेच मोठ्या लोकांना मोबाईल वापरताना पाहून आता लहान मुलेही याच अनुकरण करू लागले आहेत. मोठ्यांसारखं फोनवर बोलून दाखवण्यापासून ते सेल्फी घेण्यापर्यंत या चिमुकल्यांना अनेक गोष्टी आता समजू लागल्या आहेत. तर आज सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला हसू येईल आणि चिंताही वाटेल.

व्हायरल व्हिडीओ चिमुकल्याचा आहे. एका चिमुकल्या समोर जेवणाचं ताट ठेवल आहे. ताटात एक पदार्थ वाढून ठेवलेला असतो . ताट पुढे करताच चिमुकल्याचा गोंधळ होतो आणि तो पदार्थाला तोंडाजवळ घेऊन जाण्याऐवजी त्याच्या कानाला लावतो. मोबाईल सारखा आकार असल्यामुळे तो पदार्थ कानाला लावतो आणि हे पाहून कुटुंबातील सदस्य पोट धरून हसायला लागतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा मजेशीर व्हिडीओ एकदा बघाच.

हेही वाचा…VIDEO: ‘जॉनी जॉनी येस पापा’ कवितेला तबला अन् हार्मोनियमची साथ! देसी व्हर्जन पाहून युजर्स म्हणाले…

व्हिडीओ नक्की बघा :

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पहिला आणि त्यांच्या एक्स (ट्विट) वर शेअर केला आणि कॅप्शन लिहिले. ‘अरे नाही, नाही, नाही…. हे तर खरे आहे. आता फोन आहे, आणि त्यानंतरच अन्न वस्त्र आणि निवारा आहे’ ; असे आनंद महिंद्रा हा व्हिडीओ पाहून म्हणाले. “रोटी, कपडा और मकान” (अन्न, वस्त्र आणि निवारा) या हिंदी वाक्याचे उदाहरण देत मूलभूत गरजांपेक्षा स्मार्टफोन्सला आता प्राधान्य दिल जात आहे असे त्यांनी म्हंटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही अनेकदा ही गोष्ट अनुभवली असेल की, फोनमध्ये रिचार्ज नसेल तर कंटाळा येणे, जेवायला बसण्याआधी मोबाईल चार्जिंगला लावणे, जेवता जेवता मोबाईलवर बोलणे, स्वतःपेक्षा जास्त फोनला जपणे, आदी अनेक गोष्टी आपल्यातील अनेक जण करतात ; हे पाहून व्हिडीओ प्रमाणे लहान मुलेही अनुकरण करतात. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ आनंद महिंद्रा यांच्या @anandmahindra यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून ‘चिमुकल्यांना गॅझेट्सची खूप आवड आहे’, ‘डिजिटल मुलं’, अशा अनेक कमेंट तर काही जण हा व्हिडीओ पाहून चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.