माणसांनंतर जर कोणता सर्वात बुद्धीमान प्राणी असेल तर तो म्हणजे हत्ती. हत्तीला अनेकजण गजराज म्हणून देखील ओळखतात. हत्ती केवळ त्यांच्या ताकदीसाठीच नाही तर बुद्धीसाठीही ओळखले जातात. तो आपल्या बुद्धीच्या जोरावर जंगलातील अनेक कठीण गोष्टींचा सामना अगदी आरामात करतो. सध्या सोशल मीडियावर हत्तीशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यातून हत्तीने आपली बुद्धीमत्ता सिद्ध केली आहे. देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हत्तीचा हा व्हिडीओ ट्विटर शेअर केला असून त्यासोबत जीवनाशीसंबंधीत तीन मोलाचे संदेश दिले आहेत.

हत्तीच्या बुद्धीला तोड नाही

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक भलामोठा हत्ती जोरजोरात आवाज करत रस्त्याच्या बाजूने असलेले कुंपण काळजीपूर्वक ओलांडत असल्याचे दिसत आहे. पण हत्तीने कुंपण ओलांडण्यापूर्वी तारेला पायाने स्पर्श केला. हा हत्ती पायाने तारांमध्ये विद्युत प्रवाह आहे की नाही हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. यावेळी तारेला विद्युत प्रवाह नसून आपल्यासाठी हा रस्ता सुरक्षित असल्याचे समाधान मिळताच हत्ती सहज ते तारेचे कुंपन पायाने तुडवत आरामात रस्ता ओलांडतो.

आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडीओ

आनंद महिंद्रा यांनी यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये जीवनातील कठीण प्रसंगांचा कसा सामना करायचा याबाबत तीन मोलाचे संदेश दिले आहेत. आनंद्र महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, हत्तीचा मास्टरक्लास, ज्याला पाहून जीवनातील लहान मोठ्या अडचणींवर मात करायला शिकता येते.
१) जेव्हा एखादा मार्ग अवघड वाटतो, तेव्हा सर्वप्रथम ते आव्हान किती कठीण आहे आणि तुम्ही त्यासमोर खंबीरपणे उभे राहू शकता की नाही हे तपासण्याचा प्रयत्न करा.
२) तुम्ही स्वत:च्या ताकदीचा जास्तीत जास्त फायदा घेत त्या अडचणीतून हळू हळू मार्ग काढा.
३) आता आत्मविश्वासाने पुढे चाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आनंद्र महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला आत्तापर्यंत २ लाखांहून अधिक व्हूज मिळाले आहेत. त्याचवेळी ५ हजारांहून अधिक लोकांना हा व्हिडीओ लाईक केला आहे. याशिवाय यूजर्स कमेंट्स करुन आपली मत नोंदवत आहेत. एका युजरने लिहिले की, कठीण दिवस सुरु करण्यासाठी एक चांगला संदेश. तर दुसऱ्या एकाने लिहिले की, चांगली शिकवण.