भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. यावेळी भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले असले, तरीही एका खेळाडूने सर्वांचीच मने जिंकली आहेत. वेदा कृष्णमूर्ती इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या संघाचा भाग नाही. मात्र, सध्या ती चर्चेत आहे आणि याच कारणही तितकंच खास आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू वेदा कृष्णमूर्तीला कर्नाटकचा क्रिकेटर अर्जुन होयसालाने प्रपोज केले आहे. अर्जुन होयसालाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली. हे फोटो चाहत्यांना खूप आवडले असून ते या दोघांनाही शुभेच्छा देत आहेत.

अर्जुन होयसला याने गुडघ्यावर बसून वेद कृष्णमूर्ती हिला प्रपोज केले आहे. पोस्ट शेअर करताना अर्जुन होयसलाने लिहिले की, ‘आणि तिने हो म्हटले.’ अर्जुनने सुंदर निसर्गरम्य वातावरणार वेदा समोर आपले प्रेम व्यक्त केले. वेदा कृष्णमूर्तीनेही काही फोटो शेअर केले आहेत ज्यात दोघेही एकमेकांना अंगठी घालताना दिसत आहेत.

PAK vs SL Asia Cup 2022 : महत्त्वाचा झेल सोडलेल्या शादाब खानची भावुक पोस्ट; म्हणाला, “ही चूक…”

Photos : आगामी T20 World Cup मध्ये ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी; आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेदा कृष्णमूर्ती ही मधल्या फळीतील फलंदाज असून ती गोलंदाजीही करते. तिने २०११ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघात पदार्पण केले. वेदा कृष्णमूर्तीने टीम इंडियासाठी आतापर्यंत ४८ एकदिवसीय आणि ७६ टी२० सामने खेळले आहेत. तिने वनडेमध्ये ८२९ आणि टी२० मध्ये ८७५ धावा केल्या आहेत. तर अर्जुन होयसलाने २०१६ मध्ये कर्नाटकसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. अर्जुन होयसाला हा डावखुरा सलामीवीर आहे.