scorecardresearch

Premium

रिक्षा घेऊन जंगल सफारी करणाऱ्याला जन्माची अद्दल घडली, पिसाळलेल्या हत्तीने केलं असं काही…Video पाहून धडकी भरेल

पिसाळलेल्या हत्तीने जंगल सफारी करणाऱ्या रिक्षाचालकासह प्रवाशावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाहा हत्तीचा खतरनाक व्हिडीओ.

Elephant Attacks A Man Video Viral
पिसाळलेल्या हत्तीचा खतरनाक व्हिडीओ व्हायरल. (Instagram)

Elephant Vs Man Shocking Video Viral : जंगल सफारी करताना तुम्हाला हिंस्र पाण्यांच्या हल्ल्याचा कधी अनुभव आला आहे का? कारण ज्यांना अशा भयानक प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे, त्यांच्या अंगावर अजूनही काटा येत असेल. कारण जंगलात रिक्षा घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीवर पिसाळलेल्या हत्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रिक्षा जंगलातील रस्त्यावरून जात असतानाच अचानक एक भलामोठा हत्ती रिक्षावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. हत्तीला पाहून रिक्षात असलेल्या माणसाचा थरकाप उडतो आणि त्यानंतर जे काही घडतं, ते पाहून तुमच्याही अंगावर काट येईलच. पण रिक्षात बसलेल्या माणसाची पळता भूई पाहून तुम्हीही लोटपोट हसल्याशिवाय राहणार नाहीत.

हत्तीचा हा खतरनाक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक रिक्षाचालक प्रवाशाला घेऊन जंगलाच्या दिशेनं चाललेला असतो. त्याचदरम्यान एक महाकाय हत्ती रस्ता ओलांडत असतो. रिक्षाला पाहताच हत्ती रौद्ररुप धारण करून हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. पण पिसाळेल्या हत्तीला पाहून रिक्षाचालक आणि प्रवासी लागलीच धूम ठोकतात. मात्र, हत्ती पळून गेलेल्या माणसाचा पाठलाग करतो आणि त्याचदरम्यान आणखी एक वाहन रस्त्यावरून येत असतं.

chunabhatti hindu cemetery in worse condition
मुंबई: चुनाभट्टी स्मशानभूमीची दुरावस्था
Uttarakhand riots
उत्तराखंडमध्ये दगडफेक, ५० पोलीस जखमी, दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश, मध्यरात्री काय घडलं?
farmer injured in leopard attack in buldhana
बुलढाणा: बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी जखमी; आरडाओरड केल्याने वाचले प्राण
Ladakh shepherds stand firm against Chinese troops
VIDEO : LAC भागातून लडाखी पशुपालकांना हुसकावण्याचा चीनचा प्रयत्न; भारतीय नागरिक भिडले, अखेर ड्रॅगनची माघार

नक्की वाचा – देशी जुगाड करून बनवली पायंडल नसलेली अनोखी सायकल, भन्नाट Video पाहून लोक चक्रावले

इथे पाहा हत्तीचा खतरनाक व्हिडीओ

त्या वाहनात असलेले प्रवासी हत्तीला हटकण्याचा प्रयत्न करतात. प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून हत्तीच्या हल्ल्यातून ते कसेबसे वाचतात. कारण काही वेळानंतर हत्ती शांत होतो आणि जंगलात परत निघून जातो. हत्तीचा हा व्हिडीओ @dhana_tiger2 नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Angry elephant terrifying attack on autorickshaw man fleeing after seeing wild animal forest dangerous video viral nss

First published on: 14-09-2023 at 17:41 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×