Angry Groom Viral Video: सध्या लग्नसराई सुरू असून, सोशल मीडियावर लग्नांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. लग्न म्हटले की ,आनंद, उत्साह व थाटमाट, असे वातावरण असते. लग्नघरातील सर्व मंडळी हसतमुख, पाहुण्यांची रेलचेल आणि त्यात डान्स, गाणी, प्रथा-परंपरा, तसेच नवरा-नवरीचे खास क्षण अथवा वर-वधूचे भन्नाट किस्से व्हायरल होत असतात. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास आणि लक्षात राहणारा प्रसंग असला तरी काही वेळा एखाद्या चुकीमुळे वा चुकांमुळे संपूर्ण वातावरण बिघडू शकते. असाच काहीसा प्रकार एका लग्नात घडला आहे.

लग्नात नेहमीच गडबड असते. सगळ्या गोष्टी वेळेवर व्हाव्यात याची जास्त काळजी घ्यावी लागते. लग्नाच्या सगळ्या विधी, पाहुणेमंडळींची भेट या सगळ्यामध्ये नवरदेव अन् नवरी अगदी थकून जातात. मग या सगळ्यात जर काही विचित्र प्रकार घडला, तर त्यांची चिडचिड होणे अगदी स्वाभाविकच आहे. सध्या असाच प्रकार एका ठिकाणी घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नवरदेवाने स्टेजवरच एका व्यक्तीला मारहाण केली. अनेकांनी तो क्षण कॅमेऱ्यात कैद केला आणि मग तो सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला. त्या ठिकाणी नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेऊ…

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कपाळावर हात माराल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक भव्य लग्नसोहळा सुरू आहे. या लग्नसोहळ्यात स्टेजवर जयमाला विधीनंतर वधू आणि वर स्टेजवर बसलेले दिसत आहेत. नातेवाईक येऊन त्यांच्यासोबत फोटो काढताहेत. दरम्यान, एक व्यक्ती फोटो काढण्यासाठी स्टेजवर येते आणि नवरदेवाच्या खुर्चीच्या मागे जाऊन उभी राहते. व्हिडीओमध्ये पुढे असे दिसून आले आहे की, एक व्यक्ता पाठीमागून येतो आणि लाडाने त्याचे गालगुच्चे घेतो. हा प्रकार नवरदेवाला काही आवडत नाही. तो हात पकडून त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो. पण व्यक्ती काही ऐकायला तयार नाही. परिणामी त्यावर रागावून नवरदेव खुर्चीवरून उठतो आणि त्या गाल ओढणाऱ्या व्यक्तीला मारहाण करू लागतो. वधू आणि इतर लोक नवरदेवाला थांबविण्याचा प्रयत्न करतात; पण नवरदेव थांबत नाही आणि रागाच्या भरात तो मारहाण करीत राहतो.

येथे पाहा व्हिडीओ

sona_kumari_ji_sa नावाच्या वापरकर्त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला हा व्हिडीओ काही वेळातच व्हायरल झाला. पोस्ट केल्यापासून हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. वापरकर्त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण वराची प्रतिक्रिया योग्य असल्याचे म्हणत आहेत; तर काही वापरकर्ते ती कृती चुकीची ठरवीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.