Crocodile Vs Antelope Video: मगर ही सर्वात खतरनाक आहे हे तर सगळ्यांनाच माहित आहे. मगरीच्या नावाने भल्याभल्यांना घाम फुटतो. आपण अनेकदा सिनेमांमध्ये मगरीला पाहतो, प्रत्यक्षात मगर दिसावी असंही कोणाला वाटत नाही, कारण जर तिने शिकार केली तर त्यातून वाचण्याची शक्यता फारच कमी असते. म्हणून जरी मगर दिसली तरी पळता भुई थोडी होते.
एका फटक्यात समोरच्या प्राण्याचे दोन तुकडे करण्याची क्षमता मगरीमध्ये असते. त्यामुळेच काही जण मगरीला बोन ब्रेक मशीन, असंदेखील म्हणतात. आणि ही खतरनाक मगर जर का पाण्यात असेल, तर मग काय विचारायलाच नको. पण या सगळ्यात जर धैर्याने मगरीच्या शिकारीतून पळ काढला तर त्यापेक्षा जास्त हुशारीचं काम कोणतंच नाही.
सोशल मीडियावर मगरीच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहिले असतील, पण सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात मगरीच्या शिकारीपासून वाचण्यासाठी काळवीटाने काय केलं पाहा.
काळवीटाची शिकार होणार इतक्यात… (Animal Attack Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुमच्या पायाखालची जमिनच सरकेल. या व्हिडीओमध्ये एक धक्कादायक दृश्य दिसतंय. पाण्यात आपला जीव वाचवण्यासाठी काळवीट अगदी जीवाचं रान करून पळत सुटलाय. मगरीच्या शिकारीपासून वाचण्यासाठी तो इतके अथक प्रयत्न करताना दिसतोय. शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची त्याची ही धडपड त्याला मगरीच्या शिकारीपासून वाचण्यास मदत करते. जीवनात कितीही धोके असले तरी पुढे जाण्याखेरीज मार्ग नाही या गोष्टीला काळविटाने खरं करून दाखवलं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ या @wanderer_at_everyday या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला २ हजारापेक्षा व्ह्युज आले आहेत. तर ‘जीवनात धोके असतात पण धैर्य ठेवून पुढे जाणं हेच खरं शौर्य’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “हिंमत हारली नाही तर सगळं काही शक्य होतं”. दुसऱ्यानं, “शेवटच्या श्वासापर्यंत लढायची हिंमत असली पाहिजे, मग कोणीच आपल्याला हरवू शकत नाही”, अशी कमेंट केली. “जीवनात धोके असतात, पण जो घाबरला तो तिथेच संपला” अशीदेखील कमेंट एकाने केली.