काँग्रेस खासदार शशी थरूर आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्यातील वाद काही नेटीझन्सनला नवे नाही. गेल्याच वर्षी त्यांच्या ट्विटर वॉरची चांगलीच चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा असंच चित्र तयार झाले आहे. अनुपम खेर यांनी ट्विट करत व्हॉट्स अॅपवरचा एक मेसेज शेअर केला होता. काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा हा संदेश थरूर यांच्या जिव्हारी लागला मग त्यांनीही खेर यांना मार्मिक उत्तर दिले.
खेर यांनी ट्विट करत व्हॉट्स अपवर व्हायरल होत असलेला एक विनोद शेअर केला.
”Little girl asks Dad,” What’s the best description of ‘once upon a time’?
Dad: ‘Congress’ Party!!!”‘ असा हा विनोद होता. देशावर सत्ता गाजवणा-या काँग्रेसचे दिवस आता गेले असल्याचे अप्रत्यक्षरित्या खेर यांना सांगयाचे होते.

आता खेर यांचे ट्विट वाचून शशी थरूर शांत बसणारे थोडी होतेच. शशी थरूर यांनीही खेर यांना उत्तर देण्यासाठी ट्विट करत विनोद शेअर केला.
”मुलगी : बाबा सगळ्या परिकथा या ‘कोणे एके काळी’ या वाक्यापासून का सुरू होतात का?
बाबा : नाही, हल्लीच्या परिकथा या मित्रों या शब्दांपासूनही सुरू होतात. ”
गेल्या वर्षी आपण हिंदू आहोत, हे सार्वजनिकरित्या म्हणण्याची आपल्याला भीती वाटते, असे वक्तव्य अभिनेते अनुपम खेर यांनी केले होते. खेर ‘संघी हिंदू’ असल्याची टीका थरूर यांनी केली. तर, खेर यांनी थरूर यांना काँग्रेसचा चमचा म्हणून हिणवले होते. या दोघांच्या ट्विटवर सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया पाहायाला मिळत आहेत.

https://twitter.com/RaeesIsHere/status/838386484457664513