सर्वत्र दिवाळी अगदी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीत दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. तर आता ‘टीम कूक’ यांनीसुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. टीम कूक ॲपलचे (Apple Inc) सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व संचालक मंडळाचे सदस्य आहेत. आयफोन बनवणाऱ्या ॲपलचे सीईओ टीम कूक आहेत, तर त्यांनी अगदी खास पद्धतीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

टीम कुक यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो आयफोन १५ प्रो मॅक्स (iPhone 15 Pro Max) मध्ये काढला आहे. या फोटोत तीन तरुणांनी पारंपरिक पोशाख परिधान केला आहे. तसेच त्यांच्या हातात गरम हवेचा फुगा (आकाशकंदील) आहे आणि ते हा आकाशकंदील हवेत सोडताना दिसत आहेत. आयफोन युजरने काढलेला हा खास फोटो शेअर करत टीम कुक यांनी दिवाळीच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा…पुणेकरांचा नाद करायचा नाही! गाडीवर जागा कमी पडल्यामुळे तरुणीने चक्क डोक्यावर आणला आकाश कंदील, पाहा VIDEO

पोस्ट नक्की बघा :

दिवाळी हा प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो. तसेच सगळे जण हा सण उत्साहाने साजरा करतात. घरोघरी रांगोळ्या, तऱ्हेतऱ्हेचे आकाशकंदील; तर पणत्या लावून घराची सजावट करताना दिसतात. तर टीम कुक यांनी हा खास फोटो शेअर करत कॅप्शन लिहिले की, दिवाळीच्या शुभेच्छा! तुमचा सण आनंदात जावो. चंदन खन्ना यांनी हा फोटो आयफोन १५ प्रो मॅक्स (iPhone 15 Pro Max) वर क्लिक केला आहे, असे त्यांनी लिहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंदन खन्ना यांनी आयफोन १५ प्रो मॅक्सवरून (iPhone 15 Pro Max) हा जबरदस्त फोटो काढला असून तो टीम कुक यांच्या पसंतीस उतरला आहे. म्हणून त्यांनी या फोटोची निवड करून दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर ही पोस्ट @Tim_cook या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट पाहून या जबरदस्त फोटोचे कौतुक करताना, तर टीम कुक यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना कमेंटमध्ये दिसून आले आहे.