अॅपल आयपॅडने विमान अपघातानंतर एका व्यक्तीचे आणि त्याच्या मुलीचे प्राण वाचविण्यात मदत केली. आयपॅडने दिलेल्या सिग्नलद्वारे बचाव पथकाने वडील आणि मुलगी दोघेही वेळीच शोधून काढले. हा आयपॅड मुलीकडे होता आणि त्यामुळे दोघांचा जीव वाचला. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, या आठवड्यात रविवारी पेनसिल्वेनियामध्ये हा अपघात झाला.

या अहवालानुसार, या रविवारी, एका ५८ वर्षीय व्यक्तीने आपल्या १३ वर्षांच्या मुलीसह दोन सीटर विमानात उड्डाण केले. ही व्यक्ती पायलट आहे. टेक ऑफ होताच विमान रडारवर गायब झाले. यानंतर युनायटेड स्टेट्स एअर फोर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरकडून शोध मोहीम पाच तास चालली. जहाजाच्या शेवटच्या स्थानाच्या आधारे, बचाव पथकाने सुमारे १३ स्वयंसेवकांसह परिसराचा शोध घेतला.

( हे ही वाचा: अबब! माशाने गिळला १ मीटर लांबीचा साप; हा व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच )

कसं शोधलं ?

नंतर बचाव पथकाला समजले की पायलटने त्याच्या पत्नीशी संपर्क साधला होता आणि त्यांनी पायलटचा फोन नंबर देखील मिळवला. जेव्हा त्यांनी पायलटचा नंबर घेतला तेव्हा बचाव पथकाने त्या फोनवर कॉल केला आणि त्यांना समजले की पायलटच्या मुलीकडे आयपॅड आहे. यानंतर त्याने आयपॅडवर सिग्नल्स पिंग केले., सिग्नल पाठवल्यानंतर त्यांनी संबंधित परिसरात शोधाशोध सुरू केली. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो की फोन किंवा टॅब्लेटवर पिंग करणे ही एक अशी प्रक्रिया आहे ज्या अंतर्गत जीपीएस(GPS) द्वारे डिव्हाइसचे लोकेशन ओळखले जाऊ शकते.