Viral Video: मुलांच्या स्वप्नपूर्तीमध्ये आई-वडिलांचा पाठिंबा महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे मुलांचासुद्धा स्वप्न पूर्ण करण्याचा आत्मविश्वास आणखी वाढतो. कारण- जगभरात लाखो तरुण आपलं भविष्य घडविण्यासाठी घर सोडतात आणि या अनोळखी दुनियेत आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतात. काही तरुण आपल्या मेहनत, जिद्द व शिक्षणाच्या जोरावर आपलं ध्येय गाठतात. हे पाहून आपल्या मुलांना पाठिंबा देणाऱ्या त्या प्रत्येक आई-वडिलांना मुलांचा अभिमान वाटतो. आज अशा स्वरूपाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सैन्यात भरती झालेला तरुण जेव्हा पहिल्यांदा आई-बाबांना भेटायला येतो तेव्हा आई-वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटतो.

भारतीय सैन्यात भरती झालेला तरुण पहिल्यांदा त्याच्या घरी येतो तेव्हाचा हा क्षण आहे. त्याच्या स्वागतासाठी आजूबाजूच्या परिसरात सजावट केलेली दिसून येत आहे. त्याचे आई-वडील तयार होऊन घराबाहेर त्याची वाट पाहत आहेत आणि बहीण त्याला ओवाळण्यासाठी आरतीचं ताट हातात घेऊन उभी आहे आणि रस्त्याच्या मधोमध रांगोळी काढली आहे. रस्त्याच्या कडेला एक गाडी उभी असते आणि त्यातून भारतीय सैन्यात भरती झालेल्या तरुणाची एंट्री होते. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…बापरे! लिफ्ट थांबवण्यासाठी हात पुढे केला अन्… चिमुकल्याचा हा VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम

व्हिडीओ नक्की बघा…

दोन्ही बाजूंनी रांगोळी काढलेल्या रस्त्याच्या मधोमध गणवेशातील सैनिक संचलन करीत आई-बाबांसमोर उभा राहतो. बाबांच्या डोक्यावरची टोपी काढून, स्वतःची टोपी त्यांच्या डोक्यावर अभिमानाने घालतो. हे पाहताच बाबांचा कंठ दाटून येतो आणि आईच्या अश्रूंचा बांध फुटतो. हे पाहून तरुण दोघांनाही मिठीत घेतो जे पाहून तुम्हीही काही क्षण भावूक व्हाल. आजूबाजूच्या परिसरातील अनेक मंडळी या हृदयस्पर्शी क्षणाचे साक्षीदार झालेले दिसत आहेत. एकूणच लेकाने आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आहे, असं व्हिडीओत स्पष्ट दिसून येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Gulzar_sahab या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘अभिमानाचा क्षण’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून या तरुणाला सलाम करताना दिसत आहेत. आई-वडील आणि लेकरांचं नातं किती खास असतं हे या व्हायरल व्हिडीओतून आज पाहायला मिळालं आहे. कारण- लेकरं कितीही मोठी झाली तरीही ती आई-वडिलांच्या काळजाचा तुकडा असतात हे आज पुन्हा एकदा या व्हिडीओतून स्पष्ट झालं आहे.