भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी अवनीश शरण हे आपल्या ट्विटर पोस्टमुळे सतत चर्चेत असतात. ते नेहमी वेगवेगळ्या आकर्षक आणि प्रेरणादायी पोस्ट शेअर असतात जे अनेकांना आवडतात. ज्यामुळे अनेक नेटकरी त्यांना फॉलो करतात. अवनीश शरण यांनी असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये एक २२ वर्षीय तरुणी रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी सायकलवर सेफ्टी लाइट लावतानाचा दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओतील मुलीचे नाव खुशी पांडे असून ती लखनऊमध्ये राहते. तिच्या आजोबांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघातात खुशीचे आजोबा सायकलवरून जात असताना एका कारने त्यांना धडक दिली होती. आपल्या आजोबांचा मृत्यू झाल्यापासून खुशी इतर सायकल चावणाऱ्या लोकांचे अपघात होऊ नये यासाठी सायकलवर सेफ्टी लाईट लावण्याचं काम हाती घेतलं. त्यानुसार तिने आतापर्यंत १५०० माफत लाईट लावल्या आहेत.

Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
girl Bangladesh sexually assaulted,
डोंबिवलीतील पलावा गृहसंकुलात दोन भावांकडून बांगलादेशमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

हेही पाहा- अजमेरच्या यात्रेतील धक्कादायक दुर्घटनेचा Video व्हायरल, ५० फुटांवरून पाळणा कोसळला अन्…

हेही पाहा- मुलीने प्रेमविवाह केला म्हणून कुटुंबीयांनी उचललं टोकाचं पाऊल; नवदाम्पत्याला जबरदस्तीने गाडीत घातल अन्…

खुशी अनेकदा शहरातील प्रमुख चौकांमध्ये आपल्या हातामध्ये एक बोर्ड घेऊन उभी असते, ज्यामध्ये “सायकलवर लाइट लावा” असा मजकूर लिहिलेला असतो. अधिकाऱ्यांनी शेअर केलेला खुशीचा व्हिडिओने अनेकांची मन जिंकली आहेत. तर अनेक नेटकरी खुशीच्या कामाचं कौतुक करत आहेत. एका वापरकर्त्याने म्हटलं आहे, “या महान कामासाठी आशीर्वाद.” तर दुसर्‍या एकाने लिहिले, “चांगले काम. देव तुम्हाला आशीर्वाद देईल.” तर एका नेटकऱ्याने, सर्व सायकल उत्पादकांनी आणि वाहतूक पोलिसांनाही खुशीच्या कामाला पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं आहे.

नुकतेच राघवेंद्र कुमार नावाच्या एका तरुणाचा व्हिडीओदेखील इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. जो ‘हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध आहे, तो आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर हेल्मेटशिवाय १०० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या दुचाकीस्वाराला मोफत हेल्मेट देतो. शिवाय इतरांनाही हेल्मेट घालण्याचे महत्व पटवून देत असतो. आश्चर्याची बाब म्हणजे राघवेंद्रने आत्तापर्यंत ५६ हजारांहून अधिक हेल्मेट मोफत वाटली आहेत. शिवाय त्याने १० वर्षांत ३० लोकांचे प्राण वाचवले आहेत. राघवेंद्र रस्ता सुरक्षेसाठी जागरुकता वाढवण्याच्या दिशेने सतत काम करत असतो. त्यामुळे सध्याची तरुणाई जनजागृतीचं काम मोठ्या प्रमाणात करत असल्याचं पाहून वाहतूक विभागदेखील त्यांचे कौतुक करत आहे.