Pasayadan Marathi Video: आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात विठुरायाचा गजर होत आहे. सोशल मीडिया हे अलीकडे प्रत्येक सणाच्या शुभेच्छा देण्याचे प्राथमिक माध्यम असल्याने अनेकांच्या WhatsApp स्टोरीज, इंस्टाग्राम, फेसबुकवर सुद्धा विठ्ठलाची भक्तिगीते पाहायला- ऐकायला मिळत आहेत. अशातच एक लक्ष वेधून घेणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मुळात हा व्हिडीओ जुना असला तरी आढाढी एकादशीच्या निमित्ताने पुन्हा नेटकऱ्यांनी त्याला व्हायरल केले आहे. यामध्ये काश्मीरची एक तरुणी व अप्रतिम गायिका शमीमा अख्तर हिने सुरेल आवाजात पसायदानाचे पठण केले आहे.

शमीमा अख्तर हिचा मूळ व्हिडीओ हा Sarhad Music या युट्युब चॅनेलवर शेअर करण्यात आला होता. २०१८ ला पहिल्यांदा पोस्ट केल्यापासून या व्हिडिओची चांगलीच चर्चा झाली होती. आतापर्यंत या व्हिडिओवर ६ लाख ४३ हजार व्ह्यूज व हजारो लाईक्स व कमेंट्स आहेत. अनेकांनी आजचा बकरी ईद व आषाढी एकादशीचा योग लक्षात घेता हा व्हिडीओ दोन्ही धर्मांमधील प्रेम दर्शवणारा आहे असे म्हणत पुन्हा व्हायरल केला आहे. तुम्ही आतापर्यंत हा व्हिडीओ पाहिला नसेल तर चला पाहूया…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Video:काश्मीरच्या शमीमा अख्तरनं गायलेलं पसायदान

या व्हिडिओवर अनेकांनी लाकमेण्ट करून हीच खरी भारतीय संस्कृती आहे आहे. जात धर्माच्या पलीकडे जाऊन,संतांच्या आदर्शाना आपण पूर्ण तल्लीन होऊन भक्तिभावाने सादर करता आहात,ह्या आपल्या मानव सेवेचे मनापासून धन्यवाद, अशा पद्धतीच्या कमेंट्स केल्या आहेत. शमीमा हिच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तिने ज्या प्रकारे अमराठी भाषिकांना उच्चारताना कठीण ठरलेले ‘ष’ व ‘ळ’ ही अक्षरे सुंदररित्या उच्चारल्याचेही अनेकांनी कमेंटमध्ये नमूद केले आहे.