महेंदसिंग धोनी हा फक्त उत्तम भारतीय क्रिक्रेटरच नाही तर लाखो लोकांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व देखील आहेत. धोनीचे लाखो चाहते आहेत जे आजही त्याला आदर्श मानतात. क्रिकेटच्या मैदानावरील उत्तम खेळाडू होण्यासह धोनी सर्वांना चांगली व्यक्ती होण्याची आणि तंदरुस्त राहण्यासाठी नेहमीच प्रेरणा देतो. धोनीला आदर्श माननारे अनेक चाहते तुम्ही पाहिले असतील जे त्याच्यासह फोटो काढण्यासाठी आणि सही घेण्यासाठी प्रयत्न करतात. पण धोनीच्या एका चाहतीने असे काही केले आहे ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. धोनीकडून प्रेरणा घेत त्याच्या एका चाहतीने जागतिक विक्रम केला आहे.
अश्विनी मोंडेने विश्वविक्रम केला
महाराष्ट्रातील रायगड येथील अश्विनी मोंडे हिने ८ तासामध्ये ११८०६ स्क्वॅट्सचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. हे यश मिळवण्यासाठी तिला एमएस धोनीकडून प्रेरणा मिळाली.
हेही वाचा – चॉकलेट आइस्क्रीम कसे तयार केले जाते? पाहा फॅक्टरीमधील व्हिडिओ
एमएस धोनीचा फोटो समोर ठेवून पूर्ण केले स्क्वॉट्स
आता तुम्ही म्हणाल स्क्वॅट्स आणि एमएस धोनीचा काय संबंध आहे? महेंद्रसिंग धोनी यष्टिरक्षक म्हणून खेळतो, त्यामुळे एका सामन्यादरम्यान कीपरला अनेक स्क्वॅट्स करावे लागतात हे अधोरेखित करणे आवश्यक आह. एका आकडेवारीनुसार, कसोटी सामन्याच्या एका दिवसात सरासरी यष्टीरक्षक ५४० स्क्वॅट्स पूर्ण करतो. त्यामुळे धोनीला आदर्श मानत या तरुणीने स्क्वॉट्स पूर्ण केले आणि आपले नाव गिनिज बूकमध्ये नोंदवले. त्यासाठी तरुणीने चक्क धोनीचा फोटो समोर ठेवला होता त्यामुळे तिला ती तब्बल ८ तास तग धरू शकली ११८०६ स्क्वॅट्स पूर्ण केले. तिच्या या कामगिरीमुळे तिने एक विश्वविक्रम स्वत:च्या नावे नोंदवला आहे.
हेही वाचा – ‘मावळ्यांची शाळा!’ प्रशिक्षकाने विद्यार्थीनींना दिला आत्मरक्षणाचा धडा; Viral Video एकदा पाहाच
इंस्टाग्रामवर अश्विनीने तिच्या अधिकृतअकांऊटवर तिचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि धोनीचे आभार व्यक्त केले आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “महेंद्रसिंग धोनी ( @mahi77) ८ तासात १०००० स्क्वॅट्स पूर्ण करण्यासाठी आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न अधिकृतपणे पूर्ण करण्यासाठी तुम्ही माझ्यासाठी प्रेरणा आहात.”