देश आज भारतरत्न, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण करत आहे. २०१८ मध्ये १६ ऑगस्ट या दिवशी त्यांचे निधन झाले. आज सकाळी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या, सदैव अटल स्मारकाला भेट दिली आणि राष्ट्रीय राजधानीत जाऊन त्यांना पुष्पांजली वाहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नंतर एका ट्विटमध्ये उपराष्ट्रपती म्हणाले की, “अटलजी हे एक दूरदर्शी राजकारणी, हुशार वक्ते, विद्वान साहित्यिक आणि एक ज्येष्ठ संसदपटू होते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्राच्या निस्वार्थ सेवेसाठी समर्पित केले.” राष्ट्र उभारणीतील त्यांचे योगदान नेहमीच सन्मानाने लक्षात ठेवले जाईल, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी त्यांचे उबदार व्यक्तिमत्व, प्रेमळ स्वभाव, बुद्धी आणि विनोद आणि राष्ट्रीय प्रगतीमध्ये त्यांचे योगदान याबद्दल सांगितले. ते म्हणाले की, “अटलबिहारी वाजपेयी हे नागरिकांच्या हृदयात आणि मनात राहतात.”

विकासासाठी महत्त्वाचे योगदान

२५  डिसेंबर १९२४ रोजी ग्वाल्हीर येथे जन्मलेले, अटल बिहारी वाजपेयी यांचे भारताच्या विकासासाठी दिलेले योगदान नेहमीच सगळ्यांच्या लक्षात राहिल. त्यांना चार दशकांचा दीर्घ संसदीय अनुभव होता आणि पंतप्रधान म्हणून त्यांचा वारसा समृद्ध आहे जो आजही स्मरणात राहतो. यात पोखरण अणु चाचण्या, चतुर आर्थिक धोरणे समाविष्ट आहेत. यामुळेच स्वतंत्र भारतीय इतिहास दीर्घ पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये सतत आणि वाढीच्या दीर्घ कालावधीचा पाया घातला गेला.२०१५ साली त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तीन वेळा पंतप्रधानपद भूषवलेले अटलबिहारी वाजपेयी हे एकमेव नेते होते.

कवितेमध्येही होता रस

त्यांना केवळ राजकारणात रस न्हवता तर त्यांना कवितेतही रस होता. १९९९ मध्ये त्यांनी ज्येष्ठ गझल गायक जगजीत सिंग यांच्यासोबत ‘नई दिशा’ नावाचा अल्बम रिलीज केला. त्यात वाजपेयींनी त्यांच्या कविता कथन केल्या आणि सिंग यांनी त्या गायल्या होत्या. उत्कृष्ट वक्ते असलेल्या वाजपेयींनी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून खूप प्रसिद्धी मिळवली होती. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत हिंदीमध्ये भाषण दिले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atal bihari vajpayee death anniversary pm modi cm yogi bjp ministers pay tribute ttg
First published on: 16-08-2021 at 12:12 IST