सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. त्यातही एखाद्या प्रसंगात एखादी अनपेक्षित गोष्ट घडली तर असा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओचे वैशिष्ट्य म्हणजे यात एक खेळाडू त्याच्या गर्लफ्रेण्डला प्रपोज करत आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करणे हा आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण असतो आणि हा आनंदी क्षण नेहमी लक्षात राहावा यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. या व्हिडीओमधील खेळाडूनेदेखील त्याच्या गर्लफ्रेण्डला प्रपोज करण्याचे असेच प्लॅनिंग केले. पण त्याला ऐनवेळी एका वेगळ्याच अडचणीला सामोरे जावे लागले.

प्रचंड वेदनेत असतानादेखील खेळाडूने असे केले प्रपोज

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक खेळाडू त्याच्या गर्लफ्रेण्डला प्रपोज करण्याच्या तयारीत आहे. तो जेव्हा प्रपोज करण्यासाठी गुडघ्यावर बसण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या पायात मसल क्रॅम्प येतो. ज्यामुळे त्याला पायात प्रचंड वेदना होतात. त्याच्या मित्रांना हे लक्षात येताच ते त्याची मदत करत, त्याला आधार देतात. मित्रांच्या मदतीने उठण्याचा प्रयत्न करत तो खेळाडू गर्लफ्रेण्डला रिंग देऊन प्रपोज करतो. गर्लफ्रेण्ड ती रिंग स्वीकारते आणि दोघ एकमेकांना किस करतात.

आणखी वाचा – Dhanashree Verma and Yuzvendra Chahal: पंजाब न्यायालयात चहल आणि धनश्रीने दाखल केला घटस्फोटाचा अर्ज?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ ‘गुड न्युज मुव्हमेंट’ या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. प्रचंड वेदनेत असताना देखील या खेळाडूने केलेले हे प्रपोज नेटकऱ्यांना भावलं आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ३० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक जणांनी यावर कमेंट करत या खेळाडूचे कौतुक केले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.