Ratnagiri: आपल्या आजूबाजूला अनेक रिक्षा येत जात असतात. सकाळच्या किंवा रात्रीच्या वेळेस रिक्षेसाठी लोकांची झुंबड लागलेली असते. तुम्ही अनेकदा रिक्षा चालकाला तीन पेक्षा जास्त प्रवाशी घेऊन जात असल्याचे नक्कीच पाहिले असेल. मात्र तुम्ही कधी ड्रायव्हर शिवाय रिक्षा रस्त्यावर चालताना पाहिली आहे का? नसेल तर हा व्हिडिओ एकदा पाहाच. हा अजब प्रकार कोकणातील रत्नागिरीमध्ये घडला आहे. ज्यामध्ये ड्रायव्हर नसतानाही ही रिक्षा रस्त्यावर गोल गोल फिरताना दिसतेय. याचं नेमकं कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

खरं तर रत्नागिरी मधील जेल नाका परिसरात एका रिक्षाचा अपघात झाला. त्यामुळे या रिक्षामधील ड्रायव्हर उडून खाली पडला. मात्र या अपघातात रिक्षाचं हँडल मात्र लॉक झालं. त्यामुळे ही रिक्षा जागेवरच गोल गोल फिरू लागली. अखेर काही गावकऱ्यांनी रिक्षाला फिरण्यापासून रोखलं. कारण फिरता फिरता ही रिक्षा कोणाच्याही अंगावर जाऊन धडकली असती.

( हे ही वाचा: Video: “चोरी करून भारी वाटले पण…” चोराचे उत्तर ऐकून पोलीसही लागले हसायला अन तितक्यात…)

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा यांच्या पसंतीस पडली देसी जुगाड केलेली ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक; म्हणाले “जगासाठी…”)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात सुदैवानं ड्रायव्हरशिवाय कोणीही जखमी झालेलं नाही. या घटनेचा व्हिडिओ तेथील उपस्थित लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.