सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट पटकन व्हायरल होते. मनोरंजन हा त्यामागचा हेतू असतो. अनेकवेळा दिवसभर काम करून आपण थकतो आणि मनोरंजनासाठी सोशल मीडिया सर्फिंग करतो. त्यावेळी काही गोंडस व्हिडीओ आपला ताण विसरून चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी मदत करतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीच पिल्लू बॉलबरोबर खेळताना दिसत आहे. हा गोंडस व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला असून हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

डॅनी डेरनी यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला असून, आत्तापर्यंत या व्हिडीओला ७० हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकजणांनी या व्हिडीओवर कमेंट करत या गोंडस खेळाची प्रशंसा केली आहे. ‘हा व्हिडीओ पाहून चेहऱ्यावर हास्य येते’, ‘थेरपी व्हिडीओम्हणून हा व्हिडीओ उपयोगी ठरेल’, ‘हा व्हिडीओ पाहिल्याने दिवस आनंदात गेला’ अशा कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. पाहूया हा व्हायरल व्हिडीओ आणि त्यावरील नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

Viral Video : आरपीएफ अधिकाऱ्यांचे प्रवाशाला वाचवण्यासाठीचे थक्क करणारे प्रयत्न कॅमेऱ्यात कैद

व्हायरल व्हिडीओ :

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

आणखी वाचा : आयएएस अधिकाऱ्यांनी शेअर केला जुगाड सिंचनाचा व्हिडीओ; अनेकांना पटली नाही संकल्पना, जाणून घ्या कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेहऱ्यावर हसू आणणारा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.