सोशल मीडियावर रोज बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्या चेहऱ्यावर हसू आणत दिवसभराचा थकवा विसरण्यास मदत करणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हत्ती आणि त्याचे पिल्लू दिसत आहेत, पण त्यावेळी पिल्लू वैतागून असे काही करते की ते पाहुन तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल.

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ३० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये हत्ती आणि त्याचे पिल्लू चालताना दिसत आहेत. पण चालता चालता हे पिल्लू रस्त्याच्या मध्येच झोपते. त्याला बहुधा सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला असावा आणि ते वैतागून रस्त्यावर झोपले असा अंदाज नेटकरी बांधत आहेत.

आणखी वाचा : बेडमध्येच बनवला कामाचा सेटअप! भन्नाट कल्पनेचा Video शेअर करत हर्ष गोएंकांनी केलं कौतुक

व्हायरल व्हिडीओ :

पिल्लाचे हे नखरे पाहून त्यावरील हत्तीची प्रतिक्रिया त्याहून भन्नाट आहे. हत्तीने सरळ पिल्लाकडे दुर्लक्ष केले आणि तो पुढे चालत राहिला. नेटकऱ्यांना या पिल्लाची कृती आणि त्यावरील हत्तीची प्रतिक्रिया दोन्ही गोष्टी आवडल्या असल्याच्या कमेंट यां व्हिडीओवर केल्या आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

Viral Video : मुलासाठी आईचा भन्नाट जुगाड; हर्ष गोएंकांनी व्हिडीओ शेअर करत केलं कौतुक

आणखी वाचा : फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला लॅपटॉप पण आले भलतेच काही; तक्रार नोंदवण्यासाठी शेअर केलेले फोटो झाले व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.