बचपन का प्यार गाण्याच्या सादरीकरणाने सहदेव दिरडो एका रात्रीत प्रसिद्ध झाला. सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु झाली. बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकारणी, गायक सर्वांनीच सहदेव दिरदोच्या बच्चन का प्यार हे गाणं गात असलेला त्याचा व्हिडिओ शेअर केला. तसचं स्वतःही त्यावर व्हिडीओ बनवले. आता सहदेव दिरडोने नवीन गाण गायले आहे. नुकत्याच आलेल्या प्रसिद्ध मनी हाइस्ट सिरीजचे ‘बेला चाओ’ हे गाणं त्याने गायाल आहे. यावर नेटीझन्सने भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

मनी हाइस्टचं थीम साँग

छत्तीसगडच्या मुलाचा बेला बेला चाओ गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. बेला सियाओ हे १९ व्या शतकातील इटालियन शेतकऱ्याचे निषेध गीत आहे आणि अलीकडच्या काळात मनी हाइस्टच्या जबरदस्त यशानंतर त्याला लोकप्रियता मिळाली. मनी हाइस्ट या सिरीजमध्ये त्याचा थीम साँग म्हणून वापर केला आहे.

कित्येक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर, ला कासा डी पॅपल उर्फ ​​मनी हाइस्ट शुक्रवारी (3 सप्टेंबर) नेटफ्लिक्सवर रिलीज झाले. सीझन पाचचा पहिला भाग पाहण्यासाठी चाहते वाट बघत होते. मनी हाइस्ट ही एक स्पॅनिश वेब मालिका आहे जी जगभरात मोठी हिट ठरली. या मालिकेत उर्सुला कॉर्बेरो, अल्वारो मोर्टे, इत्झियार इटुनो, पेड्रो अलोन्सो, मिगेल हेरान आणि इतर कलाकार आहेत.

नेटीझन्सची प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडीओ हा सहदेवच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे आणि त्याला ५०८ हजार व्ह्यूज आहेत. अनेकांनी प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहले की, “एवढा आत्मविश्वास येतो कुठून?” दुसरा वापरकर्ता टिप्पणी करतो की, “तु गायन करू नकोस प्लीज” तर तिसरा म्हणतो की. “बस कर अब रुलायेगा क्या?”

bachpan ka pyaar

तुमचं काय मत आहे या व्हिडीओवरती?