सोशल मीडियावर दर दिवसाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शेअर होत असतात. त्यामध्ये प्राण्यांचे, लहान मुलांचे, नाच-गाण्याचे अशा बऱ्याच गोष्टींचे व्हिडीओ असले तरीही अनेकांना अन्नपदार्थांचे व्हिडीओ आणि फोटो बघायला सर्वात जास्त आवडत असतात. सोशल मीडियावर दिसणाऱ्या अशा पदार्थांचे व्हिडीओ पाहून अनेक जण नवनवीन पदार्थ बनवून बघत असतात. एखादे हॉटेल, कॅफे आवडल्यास तिथे भेट देतात आणि काही जण फक्त आपल्या मनाच्या समाधानासाठी असे ‘फूड व्हिडीओ’ बघत असतात.

अन्नपदार्थ बनवण्याची, शिजवण्याची प्रक्रिया बघून मनाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळत असतो. असे व्हिडीओ, सर्व सोशल मीडिया माध्यमांवर शेअर होताना आपल्याला दिसत असतात. त्यामध्ये सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या बेकिंग व्हिडीओने नेटकऱ्यांना वेड लावल्याचे दिसते. उत्तम प्रकारे शूट केलेले व्हिडीओ, चांगल्या प्रतीचे फोटो यामुळे लोकांना अन्नपदार्थ आवडीने बघावेसे वाटत असतात.

हेही वाचा : हॉटेलमध्ये हेअर ड्रायर वापरला अन् लाखभराचा झटका बसला!! काय आहे हा प्रकार जाणून घ्या…

आता उघड्यावर, निसर्गरम्य ठिकाणी शिजवले जाणारे अन्नपदार्थ असू दे किंवा स्वयंपाकघरात बनवलेले व्हिडीओ असू दे; एखादा पदार्थ बेक होताना बघण्याची मजाच काही और असते. ओव्हनमध्ये, मायक्रोवेव्हमध्ये एखादा पदार्थ कसा शिजतो हे त्या यंत्राच्या काचेतून आपल्याला व्यवस्थित पाहता येत नाही. परंतु, @cook_as_you_feel_it या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर झालेल्या बेकिंगच्या टाइमलॅप्सने नेटकऱ्यांना भुरळ घातल्याचे दिसते.

ओव्हनमध्ये बेक होण्यासाठी ठेवलेल्या विविध पदार्थांवर क्लोजअप लावून ते पदार्थ शिजताना, बेक होताना शूट करून त्यांचा तयार टाइमलॅप्स [व्हिडीओचा एक प्रकार] सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. या टाइमलॅप्समध्ये, कच्च्या मिश्रणापासून ते हळूहळू फुलत जाणाऱ्या तांबूस सोनेरी रंगाचे विविध प्रकारचे ब्रेड, क्रॉसॉन [फ्रेंच पदार्थ], पेस्ट्री आपल्याला पाहायला मिळतात.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीदेखील अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्या पाहा.

“अशा व्हिडीओमुळे मला सोशल मीडिया आवडते. राग नाही, नापसंती नाही… नुसते छान-छान अन्नपदार्थ पाहायचे”, असे एकाने लिहिले आहे. दुसऱ्याने, “मी असे व्हिडीओ तास-तासभरदेखील पाहू शकतो, इतरांनासुद्धा असेच वाटत असेल असं मला वाटतंय”, असे दुसऱ्याने लिहिले. “वाह, खूप सुंदर. बघून मजा आली”, अशी तिसऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे. “बेकिंगइतके सुंदर असते हे मला हा व्हिडीओ बघून समजले!” असे चौथा नेटकरी म्हणत आहे. शेवटी पाचव्याने, “जगातील सगळे सर्वात सुंदर पदार्थ एकाच व्हिडीओमध्ये… वाह!”, अशी कमेंट लिहिलेली पाहायला मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @cook_as_you_feel_it अकाउंटने शेअर केलेल्या या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत जवळपास ६.८ मिलियन व्ह्यूज आणि दोन लाख त्रेपन्न हजार लाईक्ससुद्धा मिळाले आहेत.