सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित व्हिडिओ अनेकदा पाहायला मिळतात. नवरा नवरीचे भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्न मंडपात चित्रविचित्र गोष्टी करून नवरी नवरी वऱ्हाडी माणसांनाही आश्चर्याचा धक्का देतात. कधी डीजेच्या तालावर थिरकतात, तर कधी स्टेजवरच रोमॅंटिक होऊन सर्वांच्या भुवया उंचावतात. अशीच एक धक्कादायक घटना एका लग्नसोहळ्यात घडली. यामध्ये नवरीने स्टेजवर नवरदेवासोबत असं काही केलं की नवरदेवानं शरमेने मान खाली घातली. हा संपूर्ण मजेशीर प्रकार कॅमेरात कैद झाल्याने व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ एका लग्नातला असून वधुच्या कृतीमुळे सर्वच जण आवाक् झाले आहेत. शक्यतो लग्नामध्ये वधु मान खाली घालून असते असं आपण पाहतो. पण व्हायरल व्हिडीओतील वधु एकदम बिनधास्त अंदाजात होती. कारण वरमाळा विधीत वधुने तर कहरच केला. वराच्या गळ्यात वरमाळा घालण्यापूर्वीच वराच्या गाळावर चुंबन घेतलं. त्यामुळे नवरदेवही लाजला तर शरमेने मान खाली घातली. हे पाहून तिथे उपस्थित असलेले लोक थक्क झाले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा- कुत्र्यानं मृत्यूला दिला चकवा! रेल्वेखाली येऊनही झाला नाही मृत्यू, Video पाहून तुम्हीही व्हाल चकीत..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर नवरा नवरीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्याने या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून नेटकरी मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत. लग्न सराईचा सीजन असल्याने काही ना काही विचित्र गोष्टी करण्याचा प्रयत्न काही जण करतात आणि सोशल मीडियावर ट्रोल होतात. लग्नातील अशाप्रकारचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांचंही जबरदस्त मनोरंजन झाल्याशिवाय राहत नाही.