BMTC Bus Driver Tries To Run Over Woman : वाहतूक नियमांचे उल्लंघन करत बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांचे कित्येक व्हिडिओ रोज चर्चेत येत असतात. यामध्ये अनेकदा बसचालकांचे व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेतात. अनेकदा हे बस चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात अन् प्रवाशांचा जीव धोक्यात टाकताना दिसतात. बस चालकांचा कधी प्रवाशांबरोबर वाद होतो तर कधी रस्त्यावरील इतर वाहनचालकांबरोबर. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. २३ मे रोजी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियम सिग्नलला बीएमटीसी बस चालकाने किरकोळ वादानंतर बस थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. महिला थोडक्यात वाचली असली तरी हा प्रकार एका कारच्या डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झाला. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बसचालकाने महिलेच्या अंगावर चढवली बस
एका आठवड्यापूर्वी ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान ही बस म्युझियम रस्ता ते एमजी रस्ता या मार्गावरून धावत होती त्यावेळी हा प्रकार घडला. अपघातामध्ये तरुणीला किरकोळ दुखापत झाली आहे. पण धक्कादायक व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.
व्हिडीओमध्ये एक महिला बससमोर उभी असल्याचे दिसते. पाहताक्षणी असे वाटते की,”महिला बसला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे पण बस चालक काहीही न ऐकता पुढे जातो. बस महिलेला अक्षरश: जोरदार धडक मारणार असते तेवढ्यात ती बाजूला जाते. तिच्या पायातील चप्पल बाजूला पडल्याचे दिसत आहे. महिला बाजूला सरकली नसती तर मोठी दुर्घटना घडली असते. सोशल मीडियावर प्रसारित व्हिडिओ पाहून बस चालकाविरोधात कारवाई केली पाहिजे.
पाहा Viral video
Video पाहून नेटकऱ्यांचा संताप
व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी रोष व्यक्त केला.
एकाने लिहिले की, “बीएमटीसी एजन्सींना ड्रायव्हिंग आउटसोर्स(बाहेरून चालक नियुक्त) करते आणि खर्च कमी करण्यासाठी ते अकुशल ड्रायव्हर्सची नियुक्ती करतात, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो…”
दुसऱ्याने लिहले की, “ती रस्त्याच्या मधोमध करत होती! मी ड्रायव्हर आणि पादचारी महिला दोघांनाही दोष देईन.”
तिसऱ्याने म्हटले की, येथे आणखी काहीतरी घडले आहे असे वाटते का, ती महिला रस्त्यावर झालेल्या वादामुळे जाणूनबुजून बस अडवत असेल?”
चौथ्याने लिहिले की, “निश्चितच ती महिला सार्वजनिक वाहतुकीत अडथळा आणून सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणारी आहे, तिच्याकडे पोलिसांकडे तक्रार करण्याचे सर्व पर्याय होते जे महिलांना नेहमीच पाठिंबा देतील, मग ती कोणाचीही चूक असो आणि पुढे तिला बीएमटीसीकडे तक्रार करण्याची आणखी एक संधी होती.
रिक्षाचालकाला महिलेने चप्पलने मारले
दुसऱ्या एका घटनेत, एका महिलेने एका ऑटो रिक्षा चालकावर तिच्या पायावरून धावण्याचा आणि संमतीशिवाय तिचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा आरोप केल्यानंतर, कॅमेऱ्यात तिच्या चप्पलांनी वारंवार मारहाण करताना कैद झाले. व्हिडिओमध्ये ती महिला रागाने ड्रायव्हरला तोंड देत असल्याचे दिसून आले आहे आणि म्हणत आहे की, “तू व्हिडिओ का काढत आहेस? तुला परवानगी कोणी दिली?” ड्रायव्हर उत्तर देतो, “मला कोणाची परवानगी घ्यावी लागेल?” त्यानंतप, महिलेने तिची चप्पल काढून त्याला अनेक वेळा मारते आणि तरी रेकॉर्डिंग सुरू ठेवण्याचे धाडस करतो.
तिला फोनवर असा दावा करताना ऐकू येते की,”ड्रायव्हरने तिच्या पायावरून रिक्षा नेली, तिच्याशी गैरवर्तन केले आणि आता तिचे व्हिडिओ बनवत आहे. ड्रायव्हर नंतर कन्नडमध्ये एका प्रेक्षकाशी बोलताना घटनेची आपली बाजू स्पष्ट करतो.”
या वादानंतर, “ऑटो रिक्षा चालकाने तक्रार दाखल केली आणि बेलांदूर पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.”