लग्न हा प्रत्येक नवरी -नवरीच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. भारतात बहुतांश लग्नामध्ये भरपूर पैसा खर्च करून दिमाखदार सोहळा साजरा केला. लग्नामध्ये कपडे, खाणे-पिणे, सजावटसह अनेक गोष्टीची हौस मौज केली जाते. आजकाल भव्यदिव्य आणि दिमाखदार लग्नाचे नियोजन करताना लोक त्यामुळे पर्यावरणाची काय हानी होत आहे आणि अन्नाची किती नासाडी होत आहे याचाही विचार करत नाहीत.

दरम्यान सध्या एका नववधूने आपल्या लग्नात शून्य कचरा प्रकल्प राबविला आहे नववधूने तिच्या इन्स्टाग्राम शून्य-कचरा विवाह सोहळा कसा साजरा केला हे सांगणारा व्हिडीओ शेअर केला आहे. नववधूच्या या प्रयत्नाचे सोशल मीडियावर कौतूक केला जात आहे. व्हिडिओमध्ये त्यांच्या लग्नसोहळ्याची झलक दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये सजावटीपासून खाण्या-पिण्यापर्यंत प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींचा विचार करण्यात आला आहे ज्यामुळे कमीत कमी अपव्यय होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

डॉक्टर पूर्वी भट यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिल आहे की, “मला माहित नाही की तज्ज्ञ याला शून्य कचरा लग्न मानतील की नाही, परंतु आम्ही या कार्यक्रमात कोणतेही प्लास्टिक वापरले नाही आणि अपव्यय कमी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. केवळ माझ्या कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळेच माझे शून्य कचरा लग्नाचे स्वप्न शक्य झाले, या सर्वामागे माझी आई होती, तिने संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन केले आणि हे आमच्यासाठी खूप समाधानकारक होते.”

हेही वाचा – आयरिश तरुणीने बंगाली लग्नात केला भारतीय डान्स, नेटकरी झाले फिदा, पाहा Viral Video

झिरो वेस्टेज लग्नात या होत्या खास गोष्टी

या लग्नात, पाहुण्यांचे स्वागत ज्यूटच्या पिशव्यांमध्ये भेटवस्तू देऊन करण्यात आले, जे पारंपारिक रॅपिंगला बायोडिग्रेडेबल पर्याय आहेत. हात धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी झाडांच्या दिशेने वळवले गेले होते, ज्यामुळे वापरलेल्या पाण्याने आजूबाजूच्या झाडांना पाणी मिळेल.

हेही वाचा – “निस्वार्थ प्रेम! आईला पुन्हा भेटून आनंदाने उड्या मारू लागला कुत्रा, पाहा गोंडस Video

लग्नाचे मुख्य आकर्षण होते ते उसाच्या देठापासून बनवलेला ‘मंडप’. लग्न समारंभानंतर उसाची रचना गायींना चारा म्हणून पुन्हा वापरण्यात येणार आहे. लग्नसमारंभात डिस्पोजेबल कप आणि प्लेट्सची जागा पारंपारिक केळीची पाने आणि मजबूत स्टीलच्या ग्लासांने घेतली आहे. सजावट देखील शून्य-कचरा पद्धतीवर आधारित होती, खोड, पाने आणि आंबा आणि नारळाची झाडे इत्यादींचा वापर करून. लग्नाचे हार आणि फुले कापसाच्या धाग्यापासून बनवले होत्या, प्लास्टिकचा वापर केला जात नव्हता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. पुर्वी भट्ट यांच्या या उपक्रमाने सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेतले असून त्याला भरपूर प्रशंसाही मिळाली आहे. एका युजरने लिहिले की, “भारतीय विवाहसोहळे सांस्कृतिकदृष्ट्या असे असले पाहिजेत.” दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, “अरे यार, हे सामान्य करा.” तिसऱ्या यूजरने लिहिले की, “मला माझे लग्न अगदी असेच बघायचे आहे. तू एक आयकॉन आहेस.”