Viral video: ‘स्पर्श’ या गोष्टीत अशी ताकद आहे की, जी माणसाला सुखावते तरी किंवा आयुष्यभरासाठी नकोशा गोष्टींची आठवण करून देणारी राहते. सार्वजनिक ठिकाणी परक्या लोकांनी जबरदस्तीने केलेल्या स्पर्शांनी कित्येकींना त्यांच्या आयुष्यात दुःखाचे क्षण दिले आहेत. त्या स्पर्शाला प्रतिकार करणे म्हणजे अब्रू राखणे हा समज रूजेल तेव्हाच हे नकोसे स्पर्श थांबतील.आपण अनेकदा समाजकंटकांना आपल्या आजूबाजूला मुलींची छेड काढताना पाहिलं आहे. कधी हे समाजकंटक रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना महिलांना अपशब्द वापरून त्रास देतात तर कधी त्यांचा पाठलाग करताना दिसतात. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत, ज्यामध्ये मुली धाडस दाखवत अशा लोकांना योग्य धडा शिकवताना दिसतात. मुली सार्वजनीक ठिकाणीही आता सुरक्षित नाही याचंच एक उदाहरण सध्या समोर आलं आहे.

असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे, ज्यामध्ये बंगळुरूमधील ही तरुणी रिक्षानं आपल्या घरी जात होती. पण रिक्षाचालकाचं वर्तन फारच विचित्र होतं. तिनं सांगितलेल्या ठिकाणी न जाता तो तिला भलत्याच दिशेला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागला. दरम्यान जेव्हा तरुणीनं विरोध केला तेव्हा तर या रिक्षा चालकानं हद्दच पार केली. हा व्हिडीओ पाहून तुमचाही संताप होईल.

ही घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. तर झालं असं की, तरुणीनं उबेर ॲपद्वारे रिक्षा बुक केली होती. पण या प्रवासात तिला धक्कादायक अनुभव आला जो प्रत्येक मुलीनं पाहून सावध राहिलं पाहिजे. तरुणीनं एका इन्स्टाग्राम व्हिडीओद्वारे हा अनुभव शेअर केला. तिच्या घराजवळ पोहोचताच रिक्षाचालकानं अचानक यु-टर्न घेतला. ती ओरडून सांगत असतानाही तो काही ऐकायला तयार नव्हता. दरम्यान तरुणी घाबरली आणि तिनं ऑटोच्या नंबर प्लेटचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. हे पाहताच रिक्षा चालक भडकला आणि रागाच्या भरात त्यानं तिच्यावर अक्षरश: हात उगारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यावेळी तरुणी म्हणतेय की, रिक्षाचा नंबर Uber ॲपवर दाखवलेल्या नंबर प्लेटशी जुळत नव्हता. त्यामुळे तो तोतया चालक असल्याचा तिला संशय आला.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ jist.news नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.