Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो लाखो व्हिडीओ शेअर होत असतात. व्हिडिओ स्क्रोल करताना कधी-कधी असे व्हिडिओ डोळ्यांसमोर येतात, जे पाहून यूजर्सला हसू आवरता येत नाही. तर काही व्हिडीओ असे असतात जे पाहून आपण आश्चर्यचकित होतो. बेंगळुरू हे त्याच्या आउट-ऑफ-द-बॉक्स स्टार्टअप कल्पना आणि उद्योजकांसाठी ओळखले जाते. क्रिप्टोकरन्सी स्वीकारणाऱ्या चाहवाल्यांपासून ते यूट्यूब चॅनेल असलेल्या ऑटोवाल्यापर्यंत सगळच नेहमी हटके पाहायला मिळतं. दरम्यान आता बेंगळुरूमधील अशाच एका अनोख्या हॉटेलची जोरदार चर्चा होतेय. उद्योगपती हर्ष गोयंका यांनी हा व्हिडीओ शेअर करत कौतुक केले आहे.

हॉटेल की तुरुंग? –

बंगरुळमध्ये एका हॉटेलचं इंटेरिअर जेलसारखं केलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हॉटेलच्या प्रवेशद्वारावर सेंट्रल जेल असे लिहिलेले आहे. या हॉटेलला नावच सेंट्रल हॉटेल असं देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या हॉटेलमधील वेटरही कैद्यांच्या पोशाखात दिसत आहेत. या हॉटेलमध्ये चिकन, मासे, गुलाबजाम, जिलेबीसारखे टेस्टी पदार्थही मिळतात. तसेच पाहिलं तर त्याठिकाणी प्रकाशही फार दिसत नाही. जेलसारखाच अंधार या हॉटेलमध्ये दिसत आहे. हर्ष गोयंका यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी आता या अनोख्या हॉटेलमध्ये जाण्यास उत्सुक झाले आहेत.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – video viral: मुले देवाघरची फुले…’या’ चिमुकलीचं होतंय सोशल मीडियावर प्रचंड कौतुक

या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.