Viral Video: टॉप भोजपुरी अभिनेत्री आणि गायिका अक्षरा सिंग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तथापि, यावेळी चित्रपट किंवा गाण्यामुळे नव्हे तर एक खाजगी एमएमएस व्हिडिओ ऑनलाइन लीक होण्याच्या चर्चांमध्ये अक्षरा सिंगचे नाव पुढे येत आहे. न्यूज18 च्या रिपोर्टनुसार, व्हिडिओमधील चेहरे स्पष्ट दिसत नाहीत, परंतु अनेकांचा दावा आहे की ती बिग बॉस ओटीटी फेम अक्षरा आहे. या व्हिडीओमध्ये एक कपल इंटिमेट होतानाचा खाजगी क्षण दिसत आहे, ज्यात मुलीला बघून अनेकांनी ही अक्षरा सिंग आहे असा दावा केला आहे.

वास्तविक याबाबतीत अक्षरा सिंग किंवा तिच्या टीमकडून आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. मात्र हा बदनामीचा प्रयत्न असल्याचे म्हणत अक्षराच्या चाहत्यांनी व्हिडीओसंदर्भातील हे दावे खोटे असल्याचे सांगितले आहे.

Video: आलियाच्या डोहाळे जेवणात नीतू कपूर मराठी गाण्यावर थिरकल्या? दीपिका व कतरिनाचा अंदाजही पाहा

दरम्यान, अक्षरा सिंग हे भोजपुरी चित्रपटांमध्ये गाजलेलं नाव आहे. जवळपास सर्व ए-लिस्टर्ससोबत तिने काम केले आहे. इंस्टाग्रामवर तिचे आतापर्यंत ४.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. अक्षरा सिंगने भोजपुरी चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी मालिकांमधून अभिनयाला सुरुवात केली. ५० हून अधिक चित्रपटांसह अक्षरा भोजपुरी चित्रपट उद्योगातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

केवळ अभिनयच नाही तर अक्षरा गायक म्हणूनही प्रसिद्ध आहे.नुकतेच तिने अभिनेता करण खन्नासोबत झुलानिया गाणे रिलीज केले. या व्हायरल एमएमएस व्हिडीओवरून अनेकांनी हा प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याचेही दावे केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Akshara singh (@singhakshara)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी, कचा बदाम फेम इंटरनेट सेन्सेशन अंजली अरोरा, हिचा एक कथित खाजगी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती चर्चेत आली होती. तथापि, या व्हिडिओमधील मुलगी आपण नसल्याचे म्हणत हाय बदनामीचा प्रयत्न आहे असे स्पष्टीकरण अंजली कडून देण्यात आले होते. अंजली अरोरा कंगना राणौतच्या लॉक अप रिअॅलिटी शोमध्ये अंतिम फेरीतील स्पर्धक होती.