Viral video: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये ४२२ कोटी रुपयांच्या डबल-डेकर फ्लायओव्हरचे उद्घाटन केले. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, एनआयटी, पीएमसीएच आणि पाटणा विद्यापीठासारख्या विविध लोकप्रिय ठिकाणांना जोडणाऱ्या अशोक राजपथ कॉरिडॉरवरील गर्दी कमी करण्याचे या फ्लायओव्हरचे उद्दिष्ट आहे. याच फ्लायओव्हरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्काच बसेल.

बिहारमध्ये पहिला डबल डेकर फ्लायओव्हर तयार झाल्यानंतर काही दिवसांतच, एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये पाटण्यातील नव्याने बांधलेल्या पुलावरून लहान मुलांचा एक गट नट आणि बोल्ट चोरताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ४-५ मुले नव्याने उद्घाटन झालेल्या पुलाचे नट आणि बोल्ट उघडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एका प्रत्यक्षदर्शीने रेकॉर्ड केला आहे. मुलांना भरदिवसा नवीन बांधलेल्या पुलावर चोरी करताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्या माणसाने त्यांना फटकारल्यानंतर मुले पळून गेली. तो माणूस “तुम लोग चोरी करना चलू कर दिया?” असे म्हणताना ऐकू येतो, ज्याचा साधारण अर्थ “तुम्ही लोकांनी चोरी करायला सुरुवात केली?” असा होतो. व्हिडिओमध्ये नंतर पुलावर मुलांनी केलेली चोरीही दाखवली आहे.

पाहा व्हिडीओ

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या. मुलांना शिक्षा करण्याची मागणी करणाऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले, “मुलांना सोडू नका. कठोर शिक्षा द्या.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले, “खरंच? कोणीही येऊन ते उघडू शकेल का? व्वा.. मग खूप विचार करून बनवले आहे.”

सोशल मीडियावर एक्सवर हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या @gemsofbabus ने ही मुले बांगलादेशी असल्याचा दावा केला आहे. या घटनेबाबत स्थानिक प्रशासन आणि कायदा अंमलबजावणी संस्थांकडून कोणतीही प्रतिक्रिया आल्याचे वृत्त नाही.” अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेला, २.२ किमी लांबीचा डबल-डेकर फ्लायओव्हर ४२२ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. हा उड्डाणपूल कारगिल चौकाला सायन्स कॉलेजशी जोडतो आणि त्यामुळे अशोक राजपथ, पीएमसीएच, पाटणा विद्यापीठ आणि सायन्स कॉलेज परिसरातील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल अशी अपेक्षा आहे. या विकासामुळे विद्यार्थी, रुग्ण आणि स्थानिक रहिवाशांना मोठा फायदा होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या उड्डाणपुलाचे दोन मजले आहेत: पहिला मजला पाटणा कॉलेज ते बीएन कॉलेज पर्यंत १.५ किमी लांब आहे. दुसरा मजला, २.२ किमी लांबीचा, कारगिल चौक ते सायन्स कॉलेज पर्यंत जातो. दोन्ही मजले ८.५ मीटर रुंद आहेत आणि एकेरी वाहतुकीसाठी डिझाइन केलेले आहेत. वरच्या मजल्यावर गांधी मैदान ते सायन्स कॉलेज पर्यंत वाहने जातील, तर खालच्या मजल्यावर पाटणा कॉलेज ते गांधी वाहतूक होईल.