बिहार मधल्या सारण जिल्ह्यामधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात काही मुली एका तरुणीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. हा सर्व प्रकार बॉयफ्रेंड वरून झाल्याचे समजण्यात येत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. पाच मुली मिळून एका मुलीला अशाप्रकारे मारताना पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

बॉयफ्रेडवरून झाले भांडण

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे या मुली तरुणीला मारत आहेत. यातील काहीजणी लाथेने मारत आहेत तर कोणी केस ओढत आहेत. यातच आजूबाजूला जमलेल्या लोकांपैकी एक तरुण त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण या मुली त्या मुलाला देखील मारत आहेत. सोशल मीडियावर झपाटयाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला पाहून अनेकांना घाम फुटला आहे.

( हे ही वाचा: Video: पर्यटकांना वाघाला जवळून पाहण्याचा मोह नडला! वाघ अचानक उड्या मारत आला अन…)

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: Video: रेल्वे कर्मचाऱ्याची हात चलाखी…; तिकीट काऊंटरवरील ‘हा’ व्हिडिओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिळालेल्या माहितीनुसार या मुली तरुणीला यासाठी मारत होत्या कारण तरुणी दुसऱ्याच्या बॉयफ्रेंडला स्वतःचा बॉयफ़्रेंड म्हणत होती. विशेष म्हणजे ती त्याच्यासोबतच जत्रेत देखील फिरत होती. या कारणावरून या मुलींनी या तरुणीला भर जत्रेत सर्वांसमोर बेदम चोपलं. या मुली कुठल्या याची अद्याप माहिती मिळाली नाही आहे.