Viral Video Train Passenger Incidents : विनाकारण कोणाशीतरी भांडणे, मुद्दामून एखाद्याला त्रास देणे, हानी पोहचवणे अशा अनेक गोष्टी करण्यात काही जण खूपच माहीर असतात. पण, या वागण्याचा इतरांवर कसा परिणाम होईल याबद्दल त्यांच्या मनात कोणताही विचार येत नाही. पण, आज अशा माणसांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये १० सेकेंदाचा रील बनवण्यासाठी एका प्रवाशाने हद्दच पार केली आहे.
बिहारमधील काही अज्ञात तरुण रेल्वे रुळाच्या बाजूला उभे आहेत आणि काठ्या हातात घेऊन ट्रेन येण्याची वाट बघत आहेत. बिहारमधील नागरी हॉल्टजवळून ट्रेन जात असताना दोन अज्ञात तरुणांनी दरवाजाजवळ बसलेल्या काही रेल्वे प्रवाशांना काठीने मारले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि रेल्वे सुरक्षा दलाने व्हिडीओ पहिला; ज्यामुळे पोलिसांना दोघांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे हा स्टंट रीलसाठी करण्यात आला आहे. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या आरोपीबरोबर फोटो पोस्ट करून ‘सोशल मीडियाचा जपून वापर करा. रेल्वे तुमच्या सेवेसाठी आहे रील बनवण्यासाठी नाही’ असे त्यांनी आवर्जून म्हंटले आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) बिहारमध्ये रेल्वे प्रवाशांवर हल्ला करणाऱ्या दोन तरुणांना अटक करून त्यांना चांगलाच धडा शिकवलं आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
ट्रेन प्रवासादरम्यान नेटकऱ्यांना आलेला धक्कादायक अनुभव
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये घटनेची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तसेच नेटकरी सुद्धा ट्रेन प्रवासादरम्यान घडलेले असे भयानक प्रसंग सांगताना दिसत आहेत. “जेव्हा मी आणि माझे कुटुंब ट्रेनने प्रवास करत होतो, तेव्हा आम्हाला कमी अंतराचा प्रवास करायचा होता म्हणून आम्ही जनरल डब्यात चढलो. त्यामुळे अचानक काही मुलांनी ट्रेनवर ४ ते ५ जड दगड फेकले. माझ्या भावाच्या बोटाला लागले आणि एका माणसाच्या डोक्याला लागून रक्त येऊ लागले” , “मी एकदा मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना एका महिलेबरोबर अशा प्रकारची घटना घडताना पाहिली होती. जेव्हा ट्रेन मानखुर्द स्टेशनच्या बोगद्यातून जात होती, तेव्हा चोर दाराजवळ लटकणाऱ्या प्रवाशांचा फोन चोरण्याचा प्रयत्न करत होते, “ही कोणत्या प्रकारची मानसिकता आहे” ; आदी अनेक प्रसंग नेटकऱ्यांनी सांगितले आहेत.