Viral Bike Stunt: काही तरुणांना बाईक चालवताना स्टंट करण्याची हौस असते. काही लोक बाईक चालवताना ती इतक्या वेगात चालवतात की, अपघात होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. अशा परिस्थितीत ते केवळ आपला जीव धोक्यात घालत नाही, तर रस्त्यावर वाहन चालवणाऱ्या इतर लोकांचाही जीव धोक्यात घालतात. परंतु, हे लोकं काही स्वत:ला आवरत नाहीत. हरिद्वार येथील पोलिसांनी इन्स्टाग्रामवर अपघाताचा एक भयानक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एका बाईकस्वाराचा अतिवेगाने स्टंट करताना भयानक अपघात होतो. या व्हिडीओवरुन एकच प्रश्न पडतो, याला मृत्यूचीही भीती नाही का?

हायवेवर जीवघेणी स्टंटबाजी!

बाईक स्टंट करत असताना तरुणाचा भयंकर अपघात झाला आहे. एका तरुणाने रस्त्यावर बरीच वाहनं जात असताना त्यातून आपली बाईक भरधाव नेली. वाऱ्याच्या वेगाने तो सुसाट बाईक पळवत गेला. पण, पुढच्याच क्षणी तो रस्त्यावर तोंडावर आपटला. व्हिडीओत असे दिसते की, एक तरुण बाईकवरून भरधाव वेगाने जातो आहे. त्याने बाईकचा वेग इतका ठेवला आहे की मोठमोठ्या गाड्यांना मागे टाकत तो वाऱ्याच्या वेगाने पळतो आहे. थोडं पुढे गेल्यावर बाईकवरील त्याचं नियंत्रण सुटतं आणि तो बाईकसह रस्त्यावर कोसळतो. काही अंतरापर्यंत बाईक त्याला फरफटत नेते, तरीही त्याचा जीव वाचतो. हे दृश्य इतके भयानक आहे की ते पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आणते. हरिद्वार पोलिसांनी या व्हिडीओद्वारे इशारा दिला आहे की, स्टंट आणि अतिवेगाने गाडी चालवणे जीवघेणे ठरू शकते.

व्हिडीओमध्ये दुचाकीस्वाराचा निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसत आहे, जो अतिवेगाने स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. अचानक तो आपला तोल गमावतो. हा अपघात इतका धोकादायक आहे की तो पाहून कोणीही थरथर कापेल. तरीही, स्वाराचे जीव वाचणे हा एक चमत्कार मानला जात आहे, ज्यामुळे लोकांना आश्चर्य वाटले.

पोलिसांनी कडक इशारा दिला

हरिद्वार पोलिसांनी व्हिडीओसह संदेश दिला आहे की, “पालक तुम्हाला खूप प्रेमाने आणि आपुलकीने वाढवतात, तुमचा जीव इतका स्वस्त समजू नका.” पोलिसांनी तरुणांना हिरोपंतीमध्ये स्टंट आणि अतिवेग टाळण्याचे आवाहन केले आहे, कारण त्यामुळे मृत्यूदेखील होऊ शकतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि लोक या अपघातातून धडा शिकण्याबद्दल बोलत आहेत. पोलिसांनी स्टंट करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले आहे.

येथे पाहा व्हिडीओ

सुरक्षिततेचा संदेश मिळाला

@haridwarpolice चा हा व्हिडीओ केवळ अपघाताची कहाणी दाखवत नाही तर रस्ता सुरक्षेचे महत्त्वदेखील सांगतो. लोक कमेंटमध्ये पोलिसांचे कौतुक करत आहेत आणि असे म्हणत आहेत की, अशा व्हिडीओंद्वारे तरुणांना जागरूक करणे महत्त्वाचे आहे. हरिद्वार पोलिसांनी स्टंटमनच्या बाईक जप्त करण्याची आणि त्यांचे व्हिडीओ डिलीट करण्याची प्रक्रियादेखील सुरू केली आहे. हा व्हिडीओ आपल्याला शिकवतो की स्टंटच्या वेडेपणापेक्षा जीवनाचे मूल्य खूप जास्त आहे.