लहान मुलांच्या नाश्त्यासाठी विविध आकाराची बिस्कीट (कुकीज) घरी बनवले जातात. चॉकलेट, काजू-बदाम, कार्टून किंवा आणखीन बऱ्याच विविध आकारात कुकीज बनवले जातात. अनेक लोकांना कुकीज खायला खूप आवडते पण मार्केटमधून विकत आणलेल्या कुकीजमध्ये मैदाचा वापर केला जातो. म्हणून काही जण हे कुकीज घरच्या घरी बनवताना दिसून येतात. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एका तरुणीने मेंदी डिझाईनचे कुकीज तयार केले आहेत.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, सगळ्यात आधी कुकी बिस्कीट बनवण्यासाठी पिठाला एका साचाच्या मदतीने हाताच्या आकाराचा देण्यात आला आहे. त्यानंतर एका पातळ टोक असणाऱ्या कोनचा उपयोग करून त्यावर डिझाईन काढली जाते. तर ही डिझाईन कार्टून किंवा कोणत्याही विशिष्ट आकाराची नसून यावर मेंदीची डिझाईन काढण्यात आली आहे. अगदी हातावर मेंदी काढली जाते अगदी त्याचप्रमाणे हे अनोखे कुकी बिस्कीट तयार करण्यात आले आहे. मेंदी डिझाईनच्या कुकीज कशा तयार केल्या एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.

हेही वाचा…अरे देवा! ‘हा’ पदार्थ घालून बनवली पाणीपुरी! पाणीपुरीप्रेमींनो, व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहिलात का?

व्हिडीओ नक्की बघा :

मेहेंदीच्या डिझाईनचे बिस्कीट :

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, हातावर जसं वेगवेगळ्या डिझाईन काढून मेंदी काढली जाते.अगदी त्याच पद्धतीत हे कुकीज तयार केले आहेत. बिस्कीट बनवण्यासाठी तयार करून घेतलेल्या पिठाला हाताचा आकार देऊन त्यावर तपकीरी रंगाच्या फूड कलरसह डिझाईन काढण्यात येते आहे. काही नेटकऱ्यांना हा चॉकलेटी रंगाचा फूड कलर आहे असे वाटले. पण, हा तपकिरी रंगाचा फूड कलर आहे असे तरुणीने कमेंट मध्ये सांगितले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sharmeendoeshenna या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तरुणीचे नाव शर्मिन आहे आणि ती मेंदी आर्टिस्ट आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी खूप अनोखी कप्लना आहे असे म्हणताना दिसत आहेत आणि तरुणीच्या कौशल्याचे कमेंटमध्ये कौतुक करताना दिसून आले आहेत.