kirit somaiya viral video राज्यभरात नवरात्रीची धामधुम सुरू आहे. सर्वत्र देवीच्या आरत्या, गरबा आणि दांडिया खेळून लोक नवरात्रीचा आनंद घेत आहेत. अगदी राजकीय मंडळी देखील नवरात्रीचा आनंद घेताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. एका सार्वजनिक गरबा कार्यक्रमात ते चक्क गरबा खेळताना दिसत आहेत. गरब्यात मग्न झालेल्या किरिट सोमय्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी सोमय्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे.

डोंबिवली सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या तर्फे नमो रमो नवरात्र उत्सव आणि डॉ. श्रीकांत शिंद : फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या रासरंग नवरात्र उत्सवात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी हजेरी लावत गरब्याच्या तालावर फेर धरला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रासरंग गरबा उत्सवात भाजपा नेते किरीट सोमय्या गरब्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. डोंबिवलीतील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलात नमो रमो नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: घरात घुसलेला साप महिलेने गळ्यात टाकला, म्हणाली माझा लेक परतला; त्याला दुध पाजलं अन् दुसऱ्या दिवशी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गरबा म्हणून या गरब्याची ओळख आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या उत्सवासाठी ६५ हजार स्क्वेअर फूटांचे भव्य डोम उभारण्यात आला असून तो पूर्णपणे वातानुकूलित आहे. संपूर्ण परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तर सेल्फी पाईण्टस हे या उत्सवाचे खास आकर्षण आहे. यंदाच्या वर्षी फूड कोर्टचीही व्यवस्था केली आहे. या उत्सवाला गरबाप्रेमींनी गर्दी केली आहे.