Viral video: आजकाल सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. आता तुम्हीच पाहा की, इथे एक कर्मचारी आणि त्याच्या बॉसचे व्हॉट्सॲपचे संभाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बर्‍याच कर्मचार्‍यांसाठी सर्वांत कठीण गोष्ट म्हणजे त्यांच्या बॉस किंवा मॅनेजरकडून रजा मंजूर केली जाणे. कारण- कर्मचाऱ्याचा रजेचा अर्ज पाहताच अनेक बॉसना डोकेदुखी होते. जवळ-जवळ प्रत्येक कर्मचारी आपल्या बॉसला कंटाळलेला असतो. काहींना तर त्यांच्या वाढदिवासालाही बॉस सुट्टी देत नाही मात्र ऑफिसमध्ये वाढदिवस हा साजरा केला जातो. अशाच एका तरुणीच्या वाढदिवसाला बॉसनं केक आणला मात्र केकवर असं काही लिहलं की तुम्हीही पोट धरुन हसाल.

बऱ्याचदा वाढदिवस हे कामांच्या दिवसांमध्येच येतात यावेळी जर बॉसचा मूड चांगला असला तर आपल्याला वाढदिवसाला सुट्टी मिळते. मात्र बऱ्याचदा वाढदिवसालाही ऑफिसला यावं लागतं. अशीच एक तरुणी वाढदिवसाला ऑफिसला आली आणि नेहमीप्रमाणे तिचा वाढदिवस ऑफिसमध्ये साजरा करण्यात आला. मात्र यावेळी सगळ्यांचंच लक्ष वेधलं ते म्हणजे केकवर लिहलेल्या मेसेजनी.. तरुणीच्या बॉसने केकवर असा मेसेज लिहलाय की पाहून तुम्हीही म्हणाल शेवटी बॉस तो बॉसच..

आता तुम्ही म्हणाल या केकवर असं लिहलंय तरी काय ? तर या केकवर “हॅप्पी बर्थडे तनिष्का प्लिज सुट्टी घेऊ नको” असा मेसेज या केकवर लिहला आहे. हे पाहून सगळेच हसू लागले. वाढदिवस जरी असला तरी केक काप पण प्लिज रजा घेऊ नकोस असा मेसेज यावर लिहला आहे. हे पाहून तनिष्कानेही नक्कीच डोक्याला हात लावला असेल.प्रत्येक ऑफिसचे वर्क कल्चर वेगळे असते. कामाच्या पद्धतीशिवाय कामाचा ताणही तितकाच जास्त असतो. दरम्यान, रजा मागणे सोपे नसते. तुम्ही जरी रजा मागितली तरी काही वेळा तुमचा रजेचा अर्ज फेटाळला जातो. अशाच तरुणीच्या वाढदिवसाला केकवर लिहलेला हा मेसेज आणि त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “महिला ही व्हर्जीन…” रिक्षा चालकानं रिक्षाच्या मागे लिहला विचित्र मेसेज; PHOTO पाहून तुम्हीच सांगा तुम्हाला हे पटलं का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ tanishka.vibess’s नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “बॉस हा बॉसच असतो” तर आणखी एकानं म्हंटलंय, “मस्करीचा भाग सोडला तर हे भयंकर आहे” अशा अनेक प्रतिक्रिया व्हिडीओवर आल्या आहेत.