scorecardresearch

Premium

जीवघेणा खेळ! धावत्या ट्रेनमध्ये तरुणाची स्टंटबाजी; मुंबई लोकलमधील थरारक व्हिडीओ होतोय व्हायरल

रेल्वे पोलिसांनी या तरुणाची ओळख पटवून त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांनी केली आहे.

A young man's stunts in a running train Thrilling video from Mumbai local is going viral
थरारक! धावत्या लोकलमध्ये तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी (फोटो सौजन्य – इंस्टाग्राम – loksattalive)

सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी अपघाताचा तर कधी स्टंटबाजीचा व्हिडीओ समोर येत असतात. सध्या असाच एक मुंबई लोकल ट्रेनमधील थराराक व्हिडिओ समोर आला आहे. गुरुवारी मध्यरात्री चर्चगेटला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका तरुणाने अचानक ट्रेनच्या दरवाजातून खाली उतरून स्टंटबाजी सुरू केली. जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धावत्या लोकलमध्ये तरुणाची जीव घेणी स्टंटबाजी

व्हिडीओमध्ये तरुण धावत्या रेल्वेच्या दरवाज्यांमध्ये उभा आहे आणि अचानक तो बोगीच्या पायऱ्यांवर लटकतांना दिसत आहे. त्याने खांबाला आत धरले आहे. तरुण अत्यंत निष्काळजीपणे हा स्टंट करताना दिसत आहे. त्याला स्वत:च्या जीवाची काहीही पर्वा नाही.चूकनही त्याचा आत खांबवरून सुटला असता तर तो ट्रेनमधून पडला असता. तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्याचा व्हिडिओ बनवला. हा प्रकार गुरुवारी रात्री १२.०५ वाजता घडला.

Jamtara Train accident
झारखंडच्या जामतारा स्थानकाजवळ मोठी दुर्घटना, रेल्वेची १२ प्रवाशांना धडक, दोन जणांचा मृत्यू
waiting journey for workers
रोहा दिवा मेमू रेल्वेची वेळ बदलल्यामुळे कामगारांना घरी परतण्याचा सव्वातासांचा प्रतिक्षा प्रवास
a traffic police keep his duty in filmy style while controlling traffic on the highway
कर्तव्याला कलेची जोड! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने दाखवला फिल्मी स्टाइल अंदाज, व्हिडीओ होतोय व्हायरल
Viral Video Girl Jumps From Moving Train Netizens Blame Cameraperson For Not Intervening
धावत्या ट्रेनमधून तरुणीने मारली उडी! थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ शुट करणाऱ्यावर भडकले नेटकरी

हेही वाचा – ”पाव्हणं जेवला काय?” गाण्यावर थिरकल्या चिमुकल्या; दोघींचा डान्स पाहून तुम्ही गौतमी पाटीललादेखील विसरून जाल

स्टंटबाजी करणाऱ्या स्टंट

मुंबई लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. जीवघेणा स्टंट करणाऱ्या तरुणाला पाहून ट्रेनमध्ये उपस्थित इतर प्रवासी चांगलेच घाबरले होते. रेल्वे पोलिसांनी या तरुणाची ओळख पटवून त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

असाच एक व्हिडिओ चार दिवसांपूर्वी समोर आला होता. एक मुलगा एका हायस्पीड ट्रेनच्या दरवाजाच्या चौकटीला धरून स्टंट करत होता. ट्रेन प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वीच या मुलाने ट्रेनमधून उडीही मारली होती. आता पुन्हा एकदा स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Boy did stunts in a running mumbai local train thrilling video viral snk

First published on: 15-09-2023 at 18:13 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×