Stunt accident video: प्रसिद्धी झोधात येण्यासाठी कुणी सेल्फी काढतं, कुणी डान्स करतं, तर कुणी एखादा स्टंट करत सोशल मीडियात अपलोड करतं. पण एका तरुणाला स्टंटबाजी करणं चांगलचं महागात पडलं आहे.सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे आपल्या नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. येथे आपल्याला कॉमेडी, इंफोर्मेटीव्ह आणि बरेच क्राफ्ट व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा उंच इमारतीवरून हिरोला स्टंट करताना पाहिलं असेल. मात्र खऱ्या आयुष्यातही काही तरुण असे अनेक स्टंट करतात, जे पाहून आपल्या अंगावर काटा उभा करतात. तर बरेच लोक असे देखील असतात, जे स्टंट करायला जातात खरं, परंतु त्यांच्यासोबत असं काहीसं घडतं, ज्याचा आपण विचार देखील करु शकत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही घाम फुटला आहे.

या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता, काही तरुण उंच इमारतीवरुन स्टंटबाजी करताना दिसत आहेत. यामध्ये तरुण एका इमारतीवर जीवाची पर्वा न करता उड्या मारत आहेत. इतक्या उंच इमारतीवरून कोणत्याही सुरक्षेशिवाय हा तरुण स्टंटबाजी करत आहे. त्यामुळे तरुणाची थोडीशी चूक त्याच्या जिवावर बेतू शकते. त्याच्या आजूबाजूला असणारे तरुण त्याला प्रोत्साहन देताना दिसत आहे. हेच सगळं सुरु असताना हा तरुण उडी मारतो आणि त्याचा अंदाज चुकल्यामुळे तो थेट खाली पडतो, त्याला कुठेही स्वत:ला वाचवण्याची संधी मिळत नाही. हे पाहून व्हिडीओ बनवणाऱ्या त्याच्या मित्रांनाही धक्का बसतो. यावेळी ते आरडाओरडा करतात मात्र त्याचा काहीच उपयोग नसतो.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DLmiGOdPWyF/?utm_source=ig_web_copy_link

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

trendy__memes__1 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. कोणत्याही सुरक्षेशिवाय तरुण अशा प्रकारे उडी मारताना पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. एकानं म्हंटलंय, “थोड्या लाईकसाठी असं करु नका आई वडिलांचा विचार करा” तर आणखी एकानं, यामधून तरुणांना धडा घेण्याचं आवाहन केलं आहे.