Emotional viral video: सोशल मीडियावर सध्या एक भावूक करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आजकाल सोशल मीडियावर पालकांना विरोध करणारे आणि असभ्य वर्तन दाखवणारे अनेक व्हिडीओ येतात. पण, या व्हिडीओने मात्र लोकांच्या मनात कुटुंबातील बंध, संस्कार आणि पालकांबद्दलचा आदर या मूल्यांची पुन्हा आठवण करून दिली आहे. व्हिडीओमध्ये दिसणारा मुलगा ज्या शांतपणे वडिलांच्या रागाला सामोरा जातो, त्याने हजारो लोकांच्या भावनांना स्पर्श केला आहे.

हा व्हिडीओ वडील आणि मुलगा यांच्यातील प्रसंगावर आधारित आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट झालेल्या या व्हिडीओमध्ये एका वयोवृद्ध वडिलांना कदाचित एखाद्या गोष्टीमुळे राग आला असावा आणि त्या संतापात ते आपल्या मुलाला रस्त्यावरच झाडूने मारताना दिसतात. आजूबाजूला लोक उभे असूनही वडिलांना कोणी थांबवताना दिसत नाही. या संपूर्ण घडामोडीने लोकांची मने हेलावून गेली आहेत.

व्हिडीओमध्ये एक तरुण मुलगा वडिलांच्या रागाचा सामना करत शांतपणे उभा आहे. वडील झाडूने त्याला वारंवार मारत असताना मुलगा कुठंही पळत नाही, विरोध करत नाही आणि काय झालं यावर कोणतंही उत्तर देत नाही. त्याच्या चेहऱ्यावर राग नाही, तक्रार नाही – उलट शांतपणे ते सर्व सहन करताना दिसतो. ज्या समाजात “पालकांची भीती नाही” यावर चर्चा केली जाते, तिथे मुलाचा हा संयम आणि वडिलांविषयीचं त्याचं न बदलणारं आदराचं नातं पाहून नेटिझन्स भावूक झाले आहेत.

पाहा व्हिडिओ

व्हिडीओ व्हायरल होताच लाखो लोकांनी तो पाहिला आणि भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिलं, “माझ्या भावालाही पप्पा असंच मारायचे, पण त्याने कधी उलट उत्तर दिलं नाही, चांगल्या मुलाची हीच ओळख आहे.” दुसऱ्या युजरने म्हटलं, “त्याने काही चूक केली असेल, पण त्याचे संस्कार पाहून त्याचा शहाणपण, आदर आणि संयम कळतो.” तिसऱ्या युजरने तर म्हटलं, “वडिलांनी मुलाला चूक झाल्यावर शिक्षा करायला हवीच. हा मुलगा भाग्यवान आहे, कारण त्याच्या डोक्यावर अजून बापाचं छत्र आहे.”

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या इंस्टाग्राम insanlogiest अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.तर आणखी एका प्रतिक्रियामध्ये लिहिलं होतं, “शाब्बास मुला! वागणूक आणि संस्कार उत्तम आहेत. पालकांनी मारलं म्हणून राग न धरता त्यांचा सन्मान करणं हेच खरे मूल्य.”