आजकाल शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर टॅटू काढण्याची क्रेझ तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. अनेकजण त्यांच्या आवडीनुसार विविध प्रकारचे टॅटू आपल्या शरीरावर बनवून घेत असतात. पण सध्या सोशल मीडियावर एका तरुणाने त्याच्या हातावर काढलेल्या टॅटूची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. शिवाय या तरुणाच्या हातावरील टॅटू पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर या तरुणाने त्याच्या शरीरावर नेमका कशाचा टॅटू काढला आणि त्याची सोशल मीडियावर चर्चा का सुरु आहे ते जाणून घेऊ या.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये एका तरुणाने त्याच्या प्रेयसीसाठी एक विचित्र आणि अनोखा टॅटू बनवल्याचं दिसत आहेत. परंतु नेटकऱ्यांना मात्र या तरुणाने त्याच्या हातावर काढलेला टॅटू फारसा आवडला नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकांनी या जोडप्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

हेही पाहा- भर उन्हात चिमुकल्यांचा पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष; व्हिडीओ पाहिल्यानंतर समजेल पाण्याची खरी किंमत

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगी तिच्या प्रियकराच्या हाताचा चावा घेते. ती चावल्यानंतर तरुणाच्या हातावर दिसणार्‍या खुणेवरच म्हणजेच प्रेयसीच्या लव्ह बाईटवरतीच तरुणाने टॅटू बनवून घेतल्याचं दिसत आहे. शिवाय तो त्याच्या प्रेयसीचं नाव आणि टॅटू कोणत्या तारखेला काढला हे देखील टॅटू काढणाऱ्याकडून लिहून घेतो. या जोडप्याने काढलेल्या विचित्र आणि अनोख्या टॅटूचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिलं आहे, “अरे या पुरे झाले आता, मी इन्स्टाग्रामच डिलीट करतो.” तर दुसऱ्या युजरने लिहिलं, “खरंच, मी इतका घाणेरडा टॅटू कधीच पाहिला नाही.” तर आणखी एकाने हे कसलं प्रेम आहे? असा प्रश्न विचारला आहे.

गर्लफ्रेंडच्या ओठांचा टॅटू खांद्यावर काढला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर असाच आणखी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ज्याओमध्ये एका गर्लफ्रेंडने तिच्या प्रियकराच्या खांद्यावर लिपस्टिक लावली आहे आणि प्रियकराने या लिपस्टिकच्या खूणेवरती टॅटू बनवून घेतला आहे. नेटकरी या व्हिडिओवरही विचित्र प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं “मी मरेन पण हे कधीच करणार नाही.” आजकाल अनेक जोडपी आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू बनवून घेतात. मात्र विचित्र प्रकारचे टॅटू काढल्यामुळे अनेकजण मोठ्या प्रमाणात ट्रोलही होत आहेत.