Shocking video: बीचवर फिरायला जाताना समु्द्राच्या पाण्याचा कोणत्याही प्रकारे धोका पत्करु नये, अशा सूचना स्थानिक प्रशासनाकडून किंवा रहिवाशांकडून वारंवार दिल्या जातात. मात्र, तरीही काही अतिउत्साही पर्यटक याकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःचे नुकसान करुन घेतात. अशीच एक घटना समुद्र किनाऱ्यावर घडली. एक तरुण बीचवर आपली नवी कोरी कार राईडसाठी घेऊन गेला आणि कारसह तो भरतीच्या पाण्यात अडकला. ही कार समुद्रांच्या लाटांवर तरंगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून कारचेही मोठे नुकसान झाले आहे. क्षणात २४ लाखांचा फटका बसलाय. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आपल्या घरासमोर एखादी महागडी गाडी उभी असावी असे प्रत्येकालाच वाटते. काही लोक हे स्वप्न प्रत्यक्षात जगतातही. महागड्या गाड्यांवर स्टंटबाजी करणे तर तरुणांना जास्तच आवडते. ही स्टंटबाजी मात्र कधीकधी चांगलीच महागात पडते. असाच एक माणूस समुद्र किनाऱ्यावर स्टंटबाजी करत असताना त्याचा अपघात झालाय.

समुद्र किनाऱ्यावर कार पार्क न करण्याचा सल्ला दिला. पण कारचालकाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत समुद्र किनारीच कार पार्क करून निघून गेला. पण त्याचा हा फाजिल आत्मविश्वास त्याला चांगलाच महागात पडला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, समुद्रकिनारी कार पूर्णपणे वाळूत अडकली आहे, जवळजवळ २४ लाखांची ही कार असून जर ती कार बाहेर काढता आली नाही तर मालकाला क्षणात २४ लाखांचा फटका बसू शकतो. ही कार काढण्यासाठी अनेकजण मदत करताना दिसत आहेत. मात्र वाळूत रुतल्यामुळे का बाहेर काढणं शक्य होत नाहीये. ही घटना दापोली येथील एका समुद्र किनाऱ्यावर घडल्याचं सांगण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Rajan Chawla (@therajanchawla)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ therajanchawla नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “२४ लाखाची गाडी घेतली पण ५ पैशाची अक्कल काय भेटली नाही! म्हणून असं झालंय”, तर दुसऱ्यानं “गाडी २४ लाखांची आणि अक्कल दीड दमडीची” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एकानं “अशा लोकांना गावातल्या लोकांनी अजिबात मदत करू नये.”