जगात प्रथमच असा प्राणी सापडला आहे जो कुत्रा आणि कोल्हा या दोन्ही प्राण्यांसासारखा दिसतो. ब्राझीलमध्ये एका कार अपघातात हा प्राणी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ती मादी होती. जी कुत्रा आणि कोल्ह्याची संकरित जाती आहे. या प्राण्याला ‘डॉग्क्सिम’ असे नाव देण्यात आले आहे.

कुत्रा आणि कोल्ह्यासारखा दिसणारा हा जगातील पहिला प्राणी ब्राझीलमध्ये सापडला आहे. कुत्रा आणि कोल्ह्याची संकरित प्रजाती. त्यामुळे त्याला डॉग्क्सिम असे नाव देण्यात आले आहे. सन २०२१ दरम्यान, ब्राझीलमध्ये कारसमोर आल्यानंतर जखमी झाल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. शास्त्रज्ञांना एक मादी कुत्र्याचा शोध लागला आहे. याबाबत बरीच चौकशी केली जात आहे.

डॉग्क्सिमची जनुकीय माहिती गोळा केली जात आहे. त्याची आई pampas कोल्हा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे तर त्याचे वडिल एक पाळीव कुत्रा आहे. त्यात कुत्रा आणि कोल्ह्याची जनुके असल्याचे शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे. त्‍यामुळे त्‍याच्‍या शरीराचा आकार, रंग, सर्व काही मिसळलेले दिसते. आत या दोन्ही प्राण्यांचे वर्तन आहे.

हेही वाचा – घनदाट जंगलामध्ये ३००० फुट उंचीवर विराजमान आहे ‘ही’ गणपती मुर्ती; व्हायरल होतोय व्हिडीओ

त्याचे कान अतिशय टोकदार, जाड असतात. संकरित असूनही हा प्राणी मानवापासून दूर पळत नाही. हे माणसांवर प्रेम करतो आणि त्यांच्या कुशीत राहायला आवडते. जेव्हा तुम्ही त्यावर प्रेमाने कुरवाळताता तेव्हा ते खेळायला सर सुरवात करते. जेव्हा शास्त्रज्ञांनी तिला अन्न दिले तेव्हा तिने खाल्ले नाही. पण जिवंत उंदीर खाल्ले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र उपचारादरम्यान ती पशुवैद्यकीय डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये मिसळली. कोल्हे आणि कुत्र्यांच्या संकरित प्रजननाची ही पहिलीच घटना समोर आली आहे. अनुवांशिक चाचणीमध्ये ७६ गुणसूत्र असल्याचे समोर आले आहे. पण कोल्ह्यामध्ये ७४ आणि कुत्र्यामध्ये ७८ गुणसुत्रे असतात. म्हणजे या दोघांमध्ये मिश्रण आहे. डॉक्टरांच्या टीमने अॅनिमल्स जर्नलमध्ये याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.