Bride Dance Viral Video: लग्न म्हटलं की, घरातील कुटुंबीयांमध्ये आनंद, जल्लोष व नाचगाणी, असे वातावरण असते. कोणत्याही लग्नात नाच-गाणे नसेल, तर त्या लग्नाला मजा येत नाही अन् भारतातील लग्न म्हटलं की डान्सशिवाय ते अपूर्ण असते. मग ती हल्ली लग्नानंतर स्वागत समारंभापूर्वीचे वधू-वरांचे मंचावर येण्यापूर्वीचे आगमन असो वा लग्नाची वरात वधू-वरांसह लोक जोरदार नाचतात. सध्या सोशल मीडियावर लग्नामधील व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे नेटकऱ्यांनादेखील लग्नामधील व्हिडीओ बघायला प्रचंड आवडते. लग्नामधील व्हिडीओमध्ये नवरदेव आणि नवरीच्या व्हिडीओंना खूप पसंती दिली जाते. सोशल मीडियावर कायमच अनेक कार्यक्रमांतील घटना व्हायरल होतात. मग कधी लग्नातील भावूक प्रसंग असो वा एखादा गमतीदार घडलेला किस्सा. आता असाच लग्नातील एक गमतीदार घडलेला किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ…
लग्नाच्या वेळी वधूची एन्ट्री महत्त्वाची मानली जाते. काही वधू बाईकवरून, काही पालखीतून तर काही नाचत हॉलमध्ये एन्ट्री करताना दिसतात. पण या लग्नात नवरीचाच गेम झालेला दिसतोय. सध्या सोशल मीडियावर एका वधूचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिच्या लग्नाच्या प्रवेशादरम्यान एक क्षण आहे, जो लोकांना मोठ्याने हसवत आहे. झाले असे की, जेव्हा वधू फुलांच्या वर्षावात पूर्ण थाटामाटात प्रवेश करीत होती, तेव्हा डीजेवाल्याकडून चुकीचे गाणे वाजवले गेले. त्यामुळे तिचा चेहरा पडला. हे गाणे नाही आहे, असे ती वारंवार सांगत होती. तरीही लग्नमंडपामध्ये चुकीचेच गाणे सुरू होते. अखेर तिने हाताने इशारा करीत हे गाणे नाही आहे, असे सांगितले. वधूने वेळ वाया न घालवता कॅमेऱ्यासमोर चेहरा केला आणि हाताने इशारा करीत स्पष्टपणे म्हटले – “नाही, हे नाही!”
पण तरीही डीजेने गाणे थांबवले नाही आणि त्यामुळे वधूचा राग आणखी स्पष्ट झाला. वधूच्या या लटक्या रागाने लग्नाच्या हॉलमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. काही पाहुणे हसणे थांबवू शकले नाहीत, तर अनेकांनी हे दृश्य त्यांच्या फोनवर कैद करण्यास सुरुवात केली.
येथे पाहा व्हिडीओ
वापरकर्त्यांच्या मजेदार प्रतिक्रियांचा पूर
या व्हिडीओला आतापर्यंत सुमारे एक लाख लाइक्स मिळाले आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये मजेदार प्रतिक्रियांचा पूर आला आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “१० मिनिटे समजावून सांगितल्यानंतरही डीजे मेल व्हर्जन गाणे काढून टाकण्यास तयार झाला नाही.” दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “वधूने विशेषतः महिला व्हर्जन गाणे मागितले होते, योजना उद्ध्वस्त झाली.”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.